फटाके मोफत घ्या, पण, ते फोडण्यासाठी नव्हे तर जमिनीत पेरण्यासाठी…
चक्क फटक्यांच्या रुपात विविध भाजी-पाल्याचे बीज तयार केले आहे.
नागपूर : दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी व्हावी म्हणून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात आगळा वेगळा यशस्वी प्रयत्न केला जातो आहे. बीज रूपातील फटाके तयार करून त्यांचा निशुल्क वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. आगळे-वेगळे असलेले हे फटाके आपल्या पर्यावरण संवर्धनासाठी फार महत्वाचे सिद्ध होणार आहेत. दीपोत्सवाचा हा ऐतिहासिक पर्व अविस्मरणीय ठरवण्यासाठी प्रत्येकजण मनसोक्त फटाके फोडून आनंद साजरा करीत असतात. मात्र, फटाके फोडताना ध्वनी आणि वायू प्रदूषणही फार मोठ्या प्रमाणात होते.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्राम आर्ट्स प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून अभिनव प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषण होते. त्यामुळं ग्राम आर्ट्स प्रकल्पने चक्क फटक्यांच्या रुपात विविध भाजी-पाल्याचे बीज तयार केले आहे.
सुतळी बॉम्ब,अनार, रस्सी, चक्कर, लाल फटाके, रॉकेट सह विविध 10 फटाक्यांमध्ये गवार, मिरची, भेंडी, टमाटर, पपई, गोबी, कांदे , आलू, लसूणसह अनेक भजीपाल्यांचे बीज टाकल्या टाकण्यात आले आहेत.
नागरिकांनी फटाके फोडण्यापेक्षा पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करून आपल्या घरी फटक्यांच्या रुपात विविध बीज लावावे. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती ग्राम आर्ट्स प्रकल्पाच्या सदस्या अरुंदती म्हात्रे यांनी दिली.
अतिशय आकर्षक, हुबेहूब फटाक्यांसारखेच सारखे दिसणारे हे बीज रुपी फटाके सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. बीजरूपी फटाक्यांना संपूर्ण देशातून मागणी होत आहे.
ग्राम आर्ट्स प्रकल्पाने यासाठी विशिष्ट बॉक्स तयार केले आहे. तब्बल 1 लाख बीजरूपी फटाके यंदा तयार करण्यात आले आहे. तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर याला यावर्षी यश आलं आहे.