विचाराल ते सेकंदात सांगतो… नागपुरात अवघ्या सहा वर्षाचा गुगल बॉय; काय आहे भानगड?

Nagpur Google Boy : असामन्य बुद्धीमत्ता, तल्लख बुद्धी अशा बिरुदावल्या पण या गुगल बॉयच्या पायाशी लोटांगण घालतात. कारण त्याचा मेंदू तर सुपर कम्युटरपेक्षा पण वेगानं धावतो. नागपुरमधील 'गुगल बॉय'ने सर्वांनाच त्याच्या अफाट बुद्धिमतेने अंचबित केले आहे.

विचाराल ते सेकंदात सांगतो... नागपुरात अवघ्या सहा वर्षाचा गुगल बॉय; काय आहे भानगड?
नागपूरचा गुगल बॉय
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 4:05 PM

6 वर्षांचं मुलं म्हणजे दंगा करणे, मस्ती, खेळणं असे चित्र आपल्यासमोर येते. पण याच वयात जर एखादा चुणचुणीत मुलगा बुद्धीच्या पल्याड काही करु लागला तर? तुम्ही त्याला जीनियस म्हणाल. पण नागपुरचा गुगल बॉयने सर्वांनाच त्याच्या अफाट बुद्धीमतेने विस्मयचकित केले आहे. अंतराळ म्हणू नका की देशांची नाव, त्यांच्या राजधान्या, या पठ्याचं सर्व काही अगदी तोंडपाठ आहे. त्याच्या या कौशल्यानं अनेकांना भुरळ घातली आहे.

दोन हजार प्रश्नांची उत्तरं तोंडपाठ

अनिश अनुपम खेडकर या चिमुकल्याने स्पेस सायन्स, रॉकेट,जेट फ्लाईट, हेलिकॉप्टर,जगातील अनेक देशांचे चलनासह अनेक विषयांचे सखोल ज्ञान मिळवले आहे. अनिशची या विषयावरील दोन हजार प्रश्नांची उत्तरं तोंडपाठ झाली आहेत अनिशला अंतरिक्ष व अंतराळवीरांच्या बाबतीत सर्वाधिक रुची आहे. त्यामुळे त्याला स्पेसच्या संदर्भातील 500 तथ्य (Facts) माहिती आहे. अनिश नेत्रदीपक यशामागे त्याची आजी स्मिता पंडित यांचे विशेष योगदान आहे. स्मिता पंडित यांनी कर्करोगाशी लढत असताना अनिशवर केलेल्या संस्कारामुळे तो आज अवघ्या सहाव्या वर्षी गुगल बॉय म्हणून नावारूपाला येत आहे.

हे सुद्धा वाचा

आजीशी जमली गट्टी

अनिशचे वय सहा वर्षे आहे. तो अवघ्या २ वर्षांचा होता, तेव्हा नागपुरला आजीकडे राहायला आला होता. अनिशचे वडील अनुपम यांना नोकरीच्या निमित्ताने शहर बदलावे लागतं असल्यामुळे अनिशची आई कल्याणी खेडकर काही काळासाठी आईकडे नागपूरला राहायला आल्या. तो अंतराळसंबंधीच्या चित्रांमध्ये रमायचा. अवघ्या दोन वर्षांचा अबोल बालकाची अंतराळाविषयीची रुची थक्क करणारी होती. इथून अनिशच्या असाधारण बुद्धीमत्तेला आकार देण्याचा प्रवास सुरु झाला. अनिशला सर्वाधिक रस हा स्पेस सायन्समध्ये आहे.

अफाट बुद्धिमतेचा धनी

  1. अनिशला अंतराळाशी संबंधित ५०० तथ्ये माहिती आहेत. त्याला जगातील १९५ देशांची राजधानी ठाऊक तर आहे,शिवाय नकाशावर देखील तो कोणता देश कुठे आहे व कोणत्या खंडात आहे,याची इत्यंभूत माहिती अनिशकडे आहे. १९५ देशाचे ध्वज तो अचूक ओळखतो.जागतिक ५० स्मारकांची त्याला माहिती आहे.भारतातील राज्ये आणि त्यांच्या राजधानीबद्दल तर विचारायलाचं नको, १५० कारचे लोगो ही तो ओळखतो.
  2. जागतिक चलनाच्या बाबतीतील त्याचे ज्ञान तर थक्क करणारे आहे. याशिवाय रॉकेल,जेट फायटर,फायटर हेलिकॉप्टर आणि मंगळयान,चंद्रयान, गगनयान, आदित्य L1 बद्दल त्याच्याकडे अफाट माहिती आहे. आजी स्मिता पंडित यांनी अनिशला घडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. रोज नवनवीन माहिती आणि प्रयोग स्मिता पंडित यांच्या घरी होऊ लागलेत. बघता-बघता अनिश अनेक विषयांमध्ये पारंगत होऊ लागला. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक स्मिता पंडित यांना कर्करोगाचे निदान झाले. एकीकडे उपचार,किमो थेरपीचा असह्य होणारा त्रास ही सहन करत त्यांनी अनिशच्या आजीने त्याच्या अभ्यासात कधीही खंड पडू दिलेला नाही.
Non Stop LIVE Update
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.