Nagpur | जय संताजी ! संत जगनाडे महाराजांना अभिवादन; कीर्तन, अभंगाच्या माध्यमातून दिली शिकवण
संताजी समता परिषद व आरटीई फाउंडेशनतर्फे संत जगनाडे महाराज यांचे जयंती निमित्त जगनाडे चौकात महारांजाच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. डिजिटल एक्स-रे 550 नागरिकांनी तपासणी करून एक्स रे प्राप्त केले. नेत्र तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, व डिजिटल एक्स-रे शिबिर आयोजित करण्यात आले.
नागपूर : समाजाला कीर्तन-अभंगाच्या माध्यमातून शिकवणी देणारे संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ व्या जयंती दिनानिमित्त विदर्भात आठ डिसेंबरला ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. नंदनवन चौकातील प्रतिमेला महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नागपूर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त विजय देशमुख, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, सहाय्यक आयुक्त महेश धामेचा, आरोग्य अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले यांनी अभिवादन केले.
संताजी समता परिषदेतर्फे नेत्र तपासणी
संताजी समता परिषद व आरटीई फाउंडेशनतर्फे संत जगनाडे महाराज यांचे जयंती निमित्त जगनाडे चौकात महारांजाच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष रमेश गिरडे, आमदार कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर, पदवीधर आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते. प्रा सचिन काळबांडे यांच्या वाढदिवसानिमित्त 150 गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. कोविड मुळे पुष्कळ नागरिकांना छातीत इन्फेक्शन होऊन विविध आजार होत आहेत. त्यामुळं डिजिटल एक्स-रे 550 नागरिकांनी तपासणी करून एक्स रे प्राप्त केले. नेत्र तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, व डिजिटल एक्स-रे शिबिर आयोजित करण्यात आले.
कोण होते जगनाडे महाराज?
संत जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्हयातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावी झाला. त्यांनी संत तुकाराम महाराजांसोबत अध्यात्म आणि विज्ञान लोकांना समजावून सांगितले. संताजींची काव्य प्रतिभा विलक्षण होती. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळं संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते. त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली.
तुकारामांचे अभंग लिहिले
एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला. त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.