Video Nagpur school | शाळेत विद्यार्थ्यांना गुढी उभारण्याचे धडे; उद्या सुटी असल्याने आजच उभारली गुढी
उद्या गुढीपाडवा. आरोग्य, विजय, नवचैतन्य आणि समृद्धीची गुढी उभारली जाते. उद्या सुट्टी असल्याने शाळेत आजच गुढी उभारण्यात आली. विद्यार्थ्यांना गुढी उभारण्याचं महत्त्व सांगण्यात आले.
नागपूर : उद्या गुढीपाडवा (Gudipadva). नववर्षाच्या दिवशी घरा-घरात विजयाची गुढी (Gudi of Victory) उभारली जाणार. पण उद्या सुट्टी असल्याने नागपुरातील काही शाळांत आजचं गुढी उभारण्यात आलीय. विद्यार्थ्यांना गुढी उभारण्याचे धडे देण्यात आले. गुढी कशी उभारली जाते? गुढी उभारण्यामागचा हेतू काय? त्यासोबत गुढी उभारण्याचं महत्त्व काय? याचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. उद्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आप-आपल्या घरी गुढी उभारावी. यासाठी एक दिवस आधी शाळेत विद्यार्थ्यांना गुढी उभारण्यामागचं महत्त्व (Importance of building Gudi.) सांगण्यात आलंय.
शुभ कार्याची सुरुवात
गुढी पाडव्यासारखे सण शरीराचं आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करतात. शरीराचं आरोग्य हे आहारावर अवलंबून असतं. आहारात बदल केला की, आरोग्य चांगलं राहतं. प्राचीन काळापासून चालत आलेले हे सण-उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात ही गुढी उभारून केली जाते.
पाहा व्हिडीओ
शकवर्षाचा प्रारंभ
गुढी पाडव्याच्या दिवशी उत्तम आरोग्यासाठी कडुनिंबाचं महत्त्व पटवून घेणं महत्त्वाचं असतं. उत्सव हे माणसाला दु:ख विसरायला लावतात. जीवनात आनंद निर्माण करतात. उत्सवाच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळी एकत्र येतात. सुसंवाद साधला जातो. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकवर्षाचा प्रारंभ होतो. त्याबरोबरच वर्षभरातल्या सण-उत्सवांचा कालनिर्देश करणाऱ्या नवीन पंचांगाचीही सुरुवात होते.