Nagpur crime | कामाच्या शोधात शहरात आला, सारखे आडनाव असल्यानं दिला आसरा, त्याने केली तिची बदनामी आणि…
भावी पतीनं रियाची विचारपूस केली. तीनं सारी हकिगत सांगितली. भविष्यातही हा त्रास देईल, या भीतीने तिने गिट्टीखदान ठाणे गाठले. रोहितविरोधात विनयभंगाची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रोहितला जेरबंद केले.
नागपूर : ही एक अनोखी स्टोरी आहे. तो गोंदियाचा. कामाच्या शोधात नागपुरात आला. आडनाव सारखे असल्यानं त्याला घरी घेण्यात आले. घरी तरुण मुलगी होती. आडनाव सारखं असल्यानं ते बहीण भावासारखे वागू लागले. पण, त्याचे तिच्यावर प्रेम जडले. तिचे लग्न ठरताच तो चवताळला. तिची बदनामी करू लागला. प्रकरण पोलिसांत गेले.
प्राप्त माहितीनुसार, 21 वर्षीय रिया (नाव बदललेलं) ही शिक्षण घेते. ती मूळची गोंदियाची आहे. तिचे आई-वडील नागपूर शहरात काम करून आपले पोट भरतात. रोहन (नाव बदललेलं) हा तिच्याच गावातील तरुण शहरात आला. शहरात तो खाद्य पदार्थांच्या डिलेव्हरी करू लागला. दरम्यान, त्याची ओळख रियाशी झाली. दोघांचेही आडनाव सारखे होते. त्यामुळं त्याला तिने घरी बोलावले. आई-वडिलांशी ओळख करून दिली. रोहननं रियाला बहीण मानले. त्यामुळं घरी ये-जा वाढली.
सारखं आडनाव असल्यानं लग्न कसं करणार?
आता सारखं आडनाव. त्यात भावा-बहिणीचं नात. त्यामुळं त्यांच्याकडं कुणी संशयाच्या नजरेनं पाहीलं नाही. दोघांची मैत्री वाढत गेली. रोहन तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. दोघांमध्ये आकर्षण वाढले. तिलाही तो आवडायला लागला. दोघेही सोबत फिरत होते. दरम्यान, रोहननं तिचे काही फोटो काढले. तिच्यासोबत काही सेल्फी काढल्या होत्या. यानंतर त्याने तिला लग्नाची मागणी घातली. परंतु, तरुणीनं त्याला आडनाव एकच असल्यामुळे कुटुंबीय काय म्हणतील, असा सवाल केला.
तिच्या भावी पतीकडे लग्न न करण्याचा दिला सल्ला
रोहन काही ऐकायला तयार नव्हता. तो रियाला लग्नाची मागणी घालू लागला. पण, तीनं असं वागणं बरं नव्हे म्हणत त्याला टाळले. दरम्यान, कुटुंबीयांनी रियासाठी नागपुरातीलचं स्थळ बघीतलं. रोहन रियाला लग्न न करण्यासाठी दमदाटी करत होता. शेवटी रियानं दुसऱ्या मुलासोबत सांक्षगंध केला. त्यामुळं रोहनचा तिडपापड उडाला. तिच्या भावी पतीचा मोबाईल नंबर मिळविला. माझे तिच्यावर प्रेम आहे. तिच्याशी काढलेले शेल्फी फोटो बघं. असं सारं सांगितलं. शिवाय रियाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला. भावी पतीनं रियाची विचारपूस केली. तीनं सारी हकिगत सांगितली. भविष्यातही हा त्रास देईल, या भीतीने तिने गिट्टीखदान ठाणे गाठले. रोहितविरोधात विनयभंगाची तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रोहितला जेरबंद केले.