Nagpur Holi Padva | होळीच्या पाडव्याची बात लई न्यारी; चिकन, मटणाचा भाव लई भारी

होळीच्या पाडव्याची बात लई भारी, असं म्हटलं जातं. पण, यानिमित्त बहुतेक लोकं चिकन, मटण खरेदी करत असल्यानं या चिकन, मटणाचे भाव वाढतात. म्हणून मटणांचे भाव लई भारी होतात. नागपुरात आज सकाळीच चिकन, मटणाच्या दुकानात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

Nagpur Holi Padva | होळीच्या पाडव्याची बात लई न्यारी; चिकन, मटणाचा भाव लई भारी
नागपुरात पाडव्यानिमित्त चिकनचे भाव वाढले आहेत. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 9:41 AM

नागपूर : होळीच्या सणाला (Holi festival) हिंदू संस्कृतीत वेगळेच महत्व आहे. काल संध्याकाळी ठिकठिकाणी होळ्या पेटल्या. होळ्या पेटल्या याचा अर्थ आपल्यातील वाईट गोष्टी जाळून टाकण्यात आल्या. समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट व्हावा, असा यामागचा उद्देश आहे. होळी झाली की, दुसरा म्हणजे आजचा दिवस पाडव्याचा (Holi Padwa). पाडव्याला खवय्यांची मज्जा असते. ही मज्जा असण्याचं कारण म्हणजे सुटीचा दिवस असतो. तो एंजाय करण्यासाठी मग चिकन, मटणावर ताव मारला जातो. त्यामुळं होळीच्या पाडव्याची बात लई भारी, असं म्हटलं जातं. पण, यानिमित्त बहुतेक लोकं चिकन, मटण खरेदी करत असल्यानं या चिकन, मटणाचे भाव वाढतात. म्हणून मटणांचे भाव लई भारी होतात. नागपुरात आज सकाळीच चिकन, मटणाच्या दुकानात ग्राहकांनी (customers in the meat shop) मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

चिकनच्या दरात 20 रुपयांची वाढ

नागपुरात होळीच्या निमित्ताने चिकन, मटणाच्या दुकानात गर्दी वाढली आहे. सकाळ घराबाहेर पडून चिकन खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. भल्या पहाटेपासून दुकानदारांनी यासाठी तयारी केली होती. पाडव्याचा दिवस असल्यानं चिकनच्या दरात 20 रुपयांची वाढ कालच्या तुलनेत पाहायला मिळाली. तरीही ग्राहकांचा चिकन, मटण खरेदीकडे मोठा प्रतिसाद दिसून येतो.

चिकन, मटण दर

बॉयलर 220 प्रती किलो खुल्ले 130 प्रती किलो हैद्राबादी गावरणी 300 प्रती किलो गावराणी 600 प्रती किलो मटण 700 रुपये प्रती किलो

मुंबईतील चहाप्रेमींचे तोंड पोळणार; चहा आणि कॉफी इतक्या रुपयांनी महागणार, टी अँड कॉफी असोसिएशनचा निर्णय

Kharif Season : रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, आता योग्य नियोजन हाच पर्याय!

Health tips : पेरूचा नियमीत आहारात समावेश करा; ‘या’ आजारांपासून मिळवा कायमची सुटका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.