MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?

महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला मतदान केलं. पण, काँग्रेसच्या नगरसेवकांनीच काँग्रेस उमेदवाराला मतदान केलं नाही, असा आरोप दुनेश्वर पेठे यांनी केलाय.

MLC election | राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये जुंपली, महाविकास आघाडीची मतं कशी फुटली?
दुनेश्वर पेठे, नागपूर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 1:09 PM

नागपूर : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटल्यावरुन नागपुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपली. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे मतं फुटल्याचं खापर काँग्रेसवर फोडण्यात आलंय. नियोजन नसल्यानं काँग्रेसची 40 पेक्षा जास्त मतं फुटलीत. राष्ट्रवादी काँग्रेसचं नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी हा गौप्यस्फोट केलाय. महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसला मतदान केलं. पण, काँग्रेसच्या नगरसेवकांनीच काँग्रेस उमेदवाराला मतदान केलं नाही, असा आरोप दुनेश्वर पेठे यांनी केलाय.

विधान परिषदेची निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिंकली. परंतु, भारतीय जनता पक्षाच्या 22 मतदारांनी विरोधात मतदान केल्याची चर्चा आहे. यात कुणी भाजपच्या विरोधात मतदान केलं, याचा शोध घेतला जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व फंडे वापरले. मतदारांना आठ ते दहा दिवस सहलीला घेऊन गेले. मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रावर आणले. एकूण 334 मतदार भाजपच्या गोटात होते.

भोयरांना मिळालेलं एक मतं कुणाचं?

एकूण 559 मतदारांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक मतदार सोबत होते. मात्र, तरीही भाजपच्या गणितात काही मतं फुटल्याची बाब समोर आली. असं होऊ शकते, याचा अंदाज बावनकुळे यांना होता. त्यामुळं त्यांनी महाविकास आघाडीच्या बहुतेक उमेदवारांशी संपर्क साधला. मतदान करण्याची विनंती केली. उमेदवार या नात्याने सर्वच मतदारांच्या भेटी घेतल्या. बावनकुळे यांना 362 मते मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 तर रवींद्र भोयर यांना एक मत मिळाले. ते कुणी दिलं ते शोधणार असल्याचं भोयर यांचं म्हणणंय. पाच मते अवैध ठरली. 176 मतांची आघाडी घेऊन त्यांनी निवडणूक जिंकली.

भाजपची 22 मते फुटल्याची शक्यता

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच अपक्ष मते बावनकुळे यांनी आपल्याकडे वळती केलीत. म्हणून त्यांचा विजय तसा सुकर झाला. पण, तरीही भाजपची 22 मते फुटल्याचे निदर्शनास आलंय. याचा शोध घेतला जातोय. मात्र, सर्वाधिक फुटलेली मते ग्रामीण भागातील आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी असलेल्यांमध्ये भाजपचे सहा सदस्य आहेत.

क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर होणार कारवाई

या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाली. याची गंभीर दखल पक्षाकडून घेण्यात आली. लक्ष्मीदर्शन करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर पक्षाकडून कारवाई होणार असल्याचंही सांगण्यात येतंय. कॉंग्रेस आणि भाजपला अपेक्षपेक्षा कमी मतं मिळाली. विरोधकांची मते मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला.

Accident | कारध्यात कंटेनरची दुचाकीला धडक, शिक्षिकेचा जागीच मृत्यू

Nagpur | मनपा शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट; शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.