Nagpur | कोरोनाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर कसा देणार?, मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितला प्लान

महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या मते कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकरिता आवश्यक कर्मचार्‍यांनी नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल.

Nagpur | कोरोनाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर कसा देणार?, मनपाच्या आरोग्य विभागाने सांगितला प्लान
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 1:47 PM

नागपूर : गेल्या आठवड्याभरात कोरोना बाधितांची संख्या अतिशय जोमाने वाढत आहे. त्यामुळं कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्लान तयार केला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

उपलब्ध मनुष्यबळ अपुरे

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महापालिकेने कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेतून कमी केले होते. आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळं महापालिकेकडून आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी उपलब्ध मनुष्यबळही अपुरे पडत आहे. नव्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया मनपाच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

300 च्यावर होते कंत्राटी कर्मचारी

कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यावेळी शासनाने कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली. त्यावेळी कोविडची कामे त्यांच्याकडून करून घेतली. महापालिकेनेही 300 वर कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. दुसरी लाट ओसरताच या सर्व कर्मचार्‍यांना ऑगस्ट 2021 मध्ये कामावरून कमी केले. हे सर्व कर्मचारी तपासणी केंद्र, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह कोविड केअर सेंटर्समध्ये काम करायचे. या कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपली सेवा सुरू ठेवण्याबाबत आंदोलन केले होते. मात्र, त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले नाही. आता नव्यानं त्यांचा विचार केला जाऊ शकतो.

दोन दिवसांपासून पथकं तैनात

नवीन वर्षात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रुग्णांच्या संपर्कात येणार्‍यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आवश्यक आहे. संक्रमण वाढण्याचा धोका ओळखण्यात आला. दोन दिवसांपूर्वी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले आहे. याकरिता झोन पातळीवर 12 पथकं तयार करण्यात आली आहेत. एका पथकात दोन कर्मचारी आहेत. एका पथकाला वीस जणांचे कॉन्टॅक्ट टेसिंग करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे पथकाकडे दररोज 20 जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे.

आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया लवकरच

कोरोना ट्रेसिंगसाठी कर्मचार्‍यांची कमतरता आहे. त्यामुळं महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्मचार्‍यांच्या अभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊ शकत नाही. महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या मते कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकरिता आवश्यक कर्मचार्‍यांनी नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही डॉ. चिलकर यांनी दिली आहे.

Nagpur Rape | प्रॉपर्टी डीलरने दिली चहाची ऑफर, शिक्षिका बेशुद्ध पडल्यानंतर केले असे की…

Fadnavis | अमृता फडणवीस-विद्या चव्हाण वाद; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?

Corona Positive | बापरे… नागपुरात जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या पोहचली दोन हजारांवर; चोवीस तासांत तब्बल 698 नव्या बाधितांची भर!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.