Nagpur Crime | पाच कोटी भेज दे नहीं तो उठा लुंगाँ, प्रफुल्ल गाडगे यांना दिलेल्या अपहरणाच्या धमकीने नागपुरात खळबळ
नागपुरातील बिल्डर प्रफुल्ल गाडगे यांना अपहरणाची धमकी देण्यात आली. गाडगे यांच्याकडे पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. सौरभ द्विवेदी या नावाने धमकीचा फोन आला.
नागपूर : प्रफुल्ल गाडगे (Praful Gadge) हे नागपुरातील बिल्डर आहेत. त्यांना पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी दिली नाही, तर तुझे अपहरण करेन, अशी धमकी फोनवरून देण्यात आली. त्यामुळं बिल्डर लॉबीत (Builder lobby) खळबळ माजली आहे. गाडगे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. नागपुरातील बजाजनगर पोलीस (Bajajnagar Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. सौरभ द्विवेदी असे नाव आरोपीने फोनवरून सांगितलं. धमकी देताना त्याने स्वतःला मुंबईतील रहिवासी असल्याचं सांगितलं. पहिल्या वेळी फोन करताना आरोपीने आवाज बदलून बोलण्याचा प्रयत्न केला. खंडणी मागत असताना शिविगाळ करत होता. गडबड नहीं करना, असे तीनवेळी सांगत होता.
तुझा पत्ता पाठवं म्हणजे उचलतो
गाडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी त्यांना मागील सात दिवसांपासून फोन करतो. माझा एक पार्टनर आहे. तो तुझे अपहरण करेल. तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. गडबज गोंधळ करायचं नाही. रात्री गुमान पैसे तयार ठेवालयं, असं गाडगे यांना फोनवरून सांगण्यात आलंय. गाडगे यांनीही पैसे मिळणार नाहीत. केव्हा उचलायचं तेव्हा उचलं, असं धमकावलं. त्यानंतर आरोपीने तुझा पत्ता पाठवं, असं म्हटल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.
असे केले तीन वेळा फोन
गाडगे यांना आठ फेब्रुवारीला पहिला फोन आला. आरोपीने गोपाल कोंडावार हा माझा पार्टनर आहे. तो तुझे अपहरण करेल, अशी धमकी दिली. तसेच शिविगाळ केल्याचंही गाडगे यांनी सांगितलं. नऊ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात पुढे जाऊ नको, असा आरोपीने सल्ला दिला. तर चौदा फेब्रुवारी रोजी पुन्हा फोन केला. तेव्हा पाच कोटी आज रात्री तयार ठेव. अन्यथा अपहरण करण्यासाठी तयार राहा, अशी धमकी दिली. या सर्व प्रकारामुळं नागपुरात पुन्हा गुन्हेगारी बळावल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे हे पोलिसांसमोर फार मोठे आव्हान आहे.