तेलही गेले, तूपही गेले, हाती… अमेरिकेचे स्वप्न भंगले, डंकी मार्गाने गेलेला तरुण नागपूरला परतला
Illegal Indian Immigrants Nagpur Man Dunki Way : अमेरिकेन काल अवैध भारतीय प्रवाशाना भारतात परत पाठवले. अमेरिकन विमान त्यांना घेऊन भारतात आले. त्यात नागपूरमधील एक तरुणाचे अमेरिकेचे स्वप्न भंगलेच नाही तर त्याला मोठा आर्थिक फटका बसला.

‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले’, अशी म्हण आपण अनेकदा ऐकतो. तर या म्हणीचा प्रत्यय नागपूरमधील एका तरुणाला आला आहे. अमेरिकेन काल अवैध भारतीय प्रवाशाना भारतात परत पाठवले. अमेरिकन विमान त्यांना घेऊन भारतात आले. त्यात नागपूरमधील एक तरुणाचे अमेरिकेचे स्वप्न भंगलेच नाही तर त्याला मोठा आर्थिक फटका बसला. या तरुणाचे जवळपास 50 लाख रुपये गेले. त्याला प्रवासादरम्यान जो त्रास सहन करावा लागला, तो वेगळाच. देशात परतल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची चौकशी केली.
हरप्रीतला 50 लाखांचा पटका
नागपूरमधील हरप्रीतसिंह ललिया हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. त्याला अमेरिकेची भुरळ होती. त्यातूनच डंकी मार्गाने अमेरिकेत जाण्याचे स्वप्न त्याने पाहिले. त्यासाठी त्याने रक्कमे जुळवली. डंकी मार्गाने अमेरिकेत जाण्यासाठी त्याने एजंटला दोन टप्प्यात पैसे दिले. अगोदर 18 लाख तर दुसर्या टप्प्यात 31 लाख 50 हजार रुपये दिले. कॅनडामार्गे त्याचा प्रवास सुरू होणार होता. पण झाले उलटेच.




पाठवलं ग्वाटामालेला
हरप्रीतसिंह यांच कॅनडाचा व्हिसा तयार करण्यात आला. पण त्याला अगोदर इजिप्तला पाठवण्यात आले. गेल्यावर्षी 2 डिसेंबर रोजी तो इजिप्तला गेला. तेथून त्याला स्पेनची राजधानी माद्रिदला गेला. तेथून त्याला कॅनडाला पाठवण्यात आलं. पण दक्षिण अमेरिकेतली ग्वाटेमाला येथे उतरवण्यात आलं. तिथे त्याला माफियासोबत राहावे लागले. त्यांच्याकडे बंदुका होत्या.
ग्वाटेमाला येथे त्याला 27 डिसेंबरपर्यंत थांबवण्यात आले. त्यानंतर त्याला विमानाने निकारागुवाला येथे नेण्यात आले. तिथून कारने होंडूरास या देशात नेण्यात आले. पुढे ग्वाटेमाल येथील निर्जनस्थळी नेण्यात आले. तिथून नदीमार्गे त्याला मॅक्सिको देशात नेण्यात आले. तिथे तो दहा दिवस माफियांच्या ताब्यात राहावे लागले. त्याच्यासोबत सतत बंदुकधारी होते. तिथून त्याला कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागली. मॅक्सिको-अमेरिका सीमारेषा ओलांडून तो अमेरिकेत पोहचला. पण त्याला सुरक्षा दलांनी अटक केली. त्याला विमानाने भारतात परत पाठवण्यात आले. नागपूरमधील पाच पावली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते.