Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसऱ्या लाटेत राज्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, ‘डॉक्टर्स डे’निमित्त 1 लाख लोकांच्या रक्तदानाचा महायज्ञ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अनेक रुग्णांना या काळात रक्ताअभावी आपला जीव गमवावा लागला.

तिसऱ्या लाटेत राज्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, 'डॉक्टर्स डे'निमित्त 1 लाख लोकांच्या रक्तदानाचा महायज्ञ
Blood
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 5:26 PM

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अनेक रुग्णांना या काळात आपला जीव गमवावा लागला. आता देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत शक्यता वर्तवल्या जात आहे. तशी परिस्थितीदेखील निर्माण झाली आहे. तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नागपूरातील ‘देवता फाऊंडेशन’ने राज्यभरातील एक लाख लोकांच्या रक्तदानाचा निर्धार केला आहे. आज (1 जुलै) ‘डॅाक्टर्स डे’निमित्त (Doctors Day) देवता फाऊंडेशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (In corona third wave, there should not be blood shortage in Maharashtra, blood donation of 1 lakh people by devta foundation)

महात्मा गांधी जयंतीपासून (2 ऑक्टोबर) या रक्तदानाच्या महायज्ञाला सुरुवात होणार आहे. राज्यभर पाच हजार किलोमीटर प्रवास करुन तब्बल एक लाख लोकांना रक्तदानाच्या या महायज्ञात सहभागी करण्याचा निर्धार ‘देवता फाऊंडेशन’ने केला आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच, तर त्याचा सामना करण्यासाठी राज्यात पुरेसा रक्तसाठा असावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं देवता फाऊंडेशनचे अध्यक्ष शरद बावने यांनी सांगितलं आहे.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दोन दिवस वाढ, तिसऱ्या लाटेची शक्यता?

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तीन हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 48 हजार 786 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1005 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

नागपूरवर डेल्टा प्लसचं संकट?

महाराष्ट्रावरील कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटचं संकट वाढताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यात एकाच कुंटुंबातील दहा जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं जिल्हा प्रशासन अ‌ॅलर्ट झालं आहे. नागपूरातील डेल्टा प्लसच्या संशयित म्हणून त्या दहा रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी निरीनं हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. आता या अहवालामध्ये काय होतंय, याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, या गोष्टी केल्यास आपण डेल्टा प्लसपासून बचाव करु शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

इतर बातम्या

Rajesh Tope PC | लसीकरणामुळेच तिसऱ्या लाटेची दाहकता कमी होईल : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोना रोखण्यासाठी लस प्रभावी, मुंबईत दोन डोस घेतलेले फक्त 26 जण बाधित

मुंबईकरांसाठी गूड न्यूज, 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

(In corona third wave, there should not be blood shortage in Maharashtra, blood donation of 1 lakh people by devta foundation)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.