नागपुरात भाजप नेते अविनाश ठाकरेंची सायकलवारी, व्यायाम आणि मतदारसंघातील जनसंपर्काचा मेळ

नागपुरात भाजप नेते अविनाश ठाकरे यांची रोज तीन तास सायकलवरून फिरणारा नगरसेवक अशी ओळख आहे. प्रभाग पद्धत रद्द होऊन वॅार्ड पद्धतीनं निवडणुकीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं नागपूर मनपातील नगरसेवक तयारीला लागलेत. अविनाश ठाकरे हे रोज तीन तास सायकलवरून जनसंपर्क साधतात.

नागपुरात भाजप नेते अविनाश ठाकरेंची सायकलवारी, व्यायाम आणि मतदारसंघातील जनसंपर्काचा मेळ
नागपुरातील भाजपचे मनपातील नेते अविनाश ठाकरे. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 10:18 AM

नागपूर : शहरात तीन सदस्यीय प्रभाग पद्धती रद्द झालीय. आता वॅार्ड पद्धतीनं आगामी महानगरपालिका (municipal election) निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपुरातील नगरसेवकांनी आपआपल्या पद्धतीनं निवडणूक तयारी सुरु केलीय. भाजपचे नेते आणि नगरसेवक अविनाश ठाकरे (corporator Avinash Thackeray) रोज सकाळी तीन तास सायकलवरुन आपल्या मतदारसंघात फिरतात. आणि लोकांच्या समस्या जाणून घेतात. सायकलवरुन फिरल्याने व्यायाम होतो. शिवाय आपल्या मतदारसंघात छोट्या मोठ्या गल्ल्यांमध्ये फिरुन लोकांच्या समस्या जाणून घेऊ शकतो. प्रभावी जनसंपर्क होतो. त्यामुळे मतदारसंघात (constituency) रोज तीन तास सायकलवारी करतो, असं अविनाश ठाकरे सांगतात.

सायकलचा फंडा

सायकल चालविल्यानं व्यायाम होतो. शरीर तंदुरुस्त राहते. जनसंपर्क चांगला राहतो. लोकांना आपलसं वाटतं. संबंधित नगरसेवक सामान्य लोकांत मिसळतो, अशी प्रतिमा निर्माण होते. लोकांमध्ये आपलेपणा वाटतो, हे सारे फायदे आहेत. म्हणून सायकलचा वापर योग्य ठरतो. शिवाय प्रदूषण होत नाही. पर्यावरणपुरक अशी ही सायकल असल्याचं अविनाश ठाकरे सांगतात.

जनतेशी नाळ जुळते

सामान्य व्यक्ती काही कारने फिरत नाही. तो सायकल किंवा दुचाकीने फिरतो. त्यामुळं जवळ जायचे असेल तर सायकलचा वापर केला जातो. लहान मुलं शाळेत जाताना सायकलच वापरतात. त्यामुळं बालकांच्या मनातही सायकल चालकांबद्दल आपुलकीची भावना निर्माण होते. मतदारांशी चांगला संपर्क साधता येतो. थांबून बोलता येते. त्यांचे प्रश्न समजून घेता येतात. ते जमिनीवर राहून सोडविता येतात. या सर्व बाबींचा निवडणुकीत फायदा होत असल्याचं अविनाश ठाकरे म्हणतात.

तीन तास सायकल सवारी

रोज दोन-तीन तास सायकल चालविल्यानं इतर व्यायाम करण्याची गरज नाही. कारण सायकल चालविणे हा एक चांगला व्यायाम आहे. त्यातही दोन-तीन तास सायकल चालविल्यानं शरीर तंदुरुस्त राहते. सहसा डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता पडत नाही.

नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण केव्हा जाहीर होणार? कार्यकाळ संपत असल्याने उत्सुकता शिगेला

चंद्रपुरात रामदेवबाबा सालव्हंट कंपनीमुळे प्रदूषण? MPCB च्या मानकानुसार यंत्रणा बसवल्याची कंपनीची स्पष्टोक्ती

चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात वाद, प्राध्यापक-व्यवस्थापन आमनेसामने, काय आहे प्रकरण?

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...