Nagpur Crime | नागपूर जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव उधळला; कोरोनामुळं बालविवाह वाढताहेत?

नागपूर जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव उधळण्यात आलाय. चंद्रपुरातील सतरा वर्षीय मुलीचा नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे विवाह होणार होता. चाईल्ड लाईनला माहिती मिळताच अधिकारी लग्नमंडपात धडकले.

Nagpur Crime | नागपूर जिल्ह्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा डाव उधळला; कोरोनामुळं बालविवाह वाढताहेत?
पाचगावात बालविवाह थांबविणारी हीच ती चमू.
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 10:12 AM

नागपूर : जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (Child Protection Officer) मुश्ताक पठाण (Mushtaq Pathan) यांनी बालविवाह थांबविल्याची माहिती दिली. सतरा फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील एका सतरा वर्षीय मुलीचा विवाह ठरला होता. नागपूर जिल्ह्यातील पाचगाव (Pachgaon in Nagpur District) येथील मुलासोबत हा विवाह होणार होता. मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिचा विवाह कायद्यानुसार करावा लागतो. अठरा वर्षांपेक्षा कमी वय असल्यानंतर लग्न केल्यास तो कायद्यानुसार गुन्हा ठरतो. हे माहीत असूनही या विवाह होणार होता. त्यासाठी या मुलीला बुधवारी, सोळा फेब्रुवारी रोजी चंद्रपूरवरून पाचगाव येथे आणण्यात आले. एका ओळखीच्या ठिकाणी मानलेल्या मामाकडे आणून ठेवण्यात आले होते. गुरुवारी सतरा फेब्रुवारी रोजी तिचा विवाह होणार होता.

पालकांकडून लिहून घेतले हमीपत्र

याची माहिती चाईल्ड लाईनला मिळाली. त्यानंतर मुश्ताक पठाण यांनी ही बाब माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्ण कोल्हे यांना सांगितली. अपर्ण कोल्हे यांनी मुश्ताक पठाण यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. पाचगावला जाऊन होणारा हा विवाह थांबविण्यात आला. मुला-मुलींच्या पालकांकडून मुलगी अठरा वर्षांची होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्यात आले.

बालविवाहांचे प्रमाण वाढतेय?

बालविवाह प्रतिबंधक कारवाई पठाण यांच्या नेतृत्वात बाल संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, साधना ठोंबरे, ग्रामसेवक प्रमोद वर्‍हाडे, सरपंच उषा ठाकरे, चाईल्ड लाईन प्रतिनिधी सुनीता गणेश, मंगला टेंभूर्णे, पोलीस शिपाई आशिष खंडाईत, चांगदेव कुथे, संजय कातडे यांनी केली. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नागपूर शहरातील यशोधरानगर परिसरात एक बालविवाह होणार होता. तो होण्यापूर्वीच जिल्हा बाल संरक्षण कक्षाला तोही रोखण्यात यश आहे होते. गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे. कोरोनामुळं लवकर लग्न करून आपल्या जबाबदारीतून काही पालक मुक्त होऊ इच्छितात. त्यामुळं कदाचित बालविवाहाचं प्रमाण वाढलं तर नाही, असा प्रश्न निर्माण होतो.

Nagpur | आता महिला उद्योजकांसाठी स्टार्ट अप, आर्थिक सक्षमीकरणाचा उपक्रम काय आहे, जाणून घ्या

Bhandara | कोरोनात जिच्या पतीचा झाला मृत्यू तिनेच सावरला व्यवसायाचा गाडा, भंडाऱ्यातील महिलेची संघर्षमय कहाणी

नागपुरात महसूल विभागाचे महाराजस्व अभियान; फेरफार अदालत शुक्रवारी, नेमकी कोणती कामे होणार?

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...