Nagpur Crime | ह्रदयद्रावक! नागपुरात कुत्र्याच्या पिल्लांना आधी काठीने बदडले, नंतर जाळून मारले

कुत्र्यांची दोन महिन्यांची पिल्ले ओरडत होती. झोपमोड होत होती. त्यामुळं दोन महिन्यांच्या बेवारस श्‍वानांना मारहाण करून जाळण्यात आले. या प्रकाराची पोलिस तक्रार देण्यात आली आहे. प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Nagpur Crime | ह्रदयद्रावक! नागपुरात कुत्र्याच्या पिल्लांना आधी काठीने बदडले, नंतर जाळून मारले
नागपुरात कुत्र्यांना मारून जाळले.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 11:10 AM

नागपूर : नागपुरात श्वानांच्या पिलांना आधी काठीने बदलले आणि नंतर जाळून टाकल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. ही घटना नागपुरातील उत्थाननगरात (Utthannagar) समोर आली. श्वानांची बेवारस पिल्लं घरात वारंवार शिरत असल्याने मारल्याची माहिती आहे. श्वानांच्या पिल्लांना मारण्याचा निवृत्त तहसीलदारावर (Retired Tehsildar) आरोप आहे. याप्रकरणी मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आरोपीकडून पिल्लांना मारल्याच्या आरोपाचा इन्कार केलाय. मानकापूर पोलिसांकडून (Mankapur Police) अधिक तपास सुरू आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

झोप येत नसल्याचा त्रास

उत्थाननगर येथील उत्तमकुमार दास असे या निर्दयी व्यक्तीचे नाव आहे. उत्तमकुमार हे निवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. त्यांना झोप येत नसल्याने ते झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत असतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घराच्या आसपास मोकाट कुत्र्यांची दोन पिल्ले भटकत होती. रात्रीच्या वेळी दोन्ही पिल्ले हे ओरडत असतं. यामुळे उत्तमकुमार यांची झोपमोड होत असे, अशी माहिती आहे.

घरातही घुसत होते

कधीकधी ही पिल्ले त्यांच्या घरातही घुसण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याऐवजी वा महानगरपालिकेला याबाबत रितसर कळवायला हवे होते. त्यांनी स्वत:च त्या पिल्लांचा बंदोबस्त करण्याचा निर्धार केला. रागाच्या भरात या व्यक्तीने गुरुवारी सायंकाळी कुत्र्याच्या पिल्लांना काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यांना घरामागील परिसरात जा टाकले.

पोलिसांत तक्रार

एखाद्याने याचे चित्रिकरण केले. त्यानंतर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. आरएडी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्या रोशनी गावंडे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यावेळी दोन पिल्ले अधर्वट जळालेल्या अवस्थेत मृत दिसली. गावंडे यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी उत्तमकुमारवर गुन्हा दाखल केला.

CCTV : लेडिज वेअरमधून हजारोंच्या मालावर चोरट्यानं केला हात साफ; पुण्याच्या तळेगाव दाभाडेतली चोरी सीसीटीव्हीत कैद

Ulhasnagar Mockdrill : उल्हासनगरात पोलिसांकडून दंगल नियंत्रणाचं मॉकड्रिल, भोंग्यांच्या मुद्द्यावर पोलिसांना सज्ज राहण्याच्या सूचना?

Mumbai Crime : मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई, भिंतीत 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा हस्तगत

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.