एक महिना होऊनही अद्याप विद्यार्थ्यांना बॅग्स मिळाल्याच नाहीत, या भाजप आमदारानं असा साजरा केला मोदींचा वाढदिवस

तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही पाठवायचं आहे, असं सांगण्यात आलं.

एक महिना होऊनही अद्याप विद्यार्थ्यांना बॅग्स मिळाल्याच नाहीत, या भाजप आमदारानं असा साजरा केला मोदींचा वाढदिवस
आमदार मोहन मते
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 3:26 PM

नागपूर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर हा वाढदिवस. त्यानिमित्तानं भाजपचे (MLA) आमदार मोहन मते यांनी रेशीमबाग मैदानावर पंतप्रधान मोदी (Prime Minister) यांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरविलं. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आमदार मोहन मते यांनी दोन हजार विद्यार्थ्यांना बॅग्सचे वितरण करण्याचं ठरविलं, असं यासंदर्भातील काम पाहणारे सारंग गोडबोले यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी काही शाळांतील मुख्याध्यापकांना मिटिंगसाठी बोलावलं. या मिटिंगमध्ये आम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग्स देणार आहोत. बॅग्समध्ये टिफीन, बॉटल, कंपास, वह्या असं शैक्षणिक साहित्य राहणार असल्याचं सांगितलं.

मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांना 17 सप्टेंबरला शनिवारी दुपारी चार वाजता रैशीमबाग मैदानावर पाठविण्यासाठी तयार झाले. आमदार मते यांच्या वतीनं सारंग गोडबोले यांनी मुख्याध्यापक, शिक्षकांशी संपर्क साधला. आमदार मते यांच्या लेटरपॅडवर संबंधित शाळांना पत्र देण्यात आलं. शाळेकडून विद्यार्थ्यांच्या नावाची मोबाईलसह यादी मागविण्यात आली. तुम्हाला विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही पाठवायचं आहे, असं सांगण्यात आलं.

बॅग्स नव्हत्या मग दोन हजार पासेस वितरित कशाला केल्या

विद्यार्थी घरी आले. त्यांनी पालकांना सांगितलं. आपल्याला 17 सप्टेंबरला शनिवारी मोदींच्या वाढदिवसानिमित्त रेशीमबाग मैदानावर जायचं आहे. त्याठिकाणी पालक विद्यार्थ्यांसह आल्यास त्यांना बॅग्स देण्यात येणार आहेत. दोन हजार विद्यार्थ्यांना पास देण्यात आल्या. ज्यांच्याकडं पास असतील, त्यांनाच आणि जे पालकांसह येतील, त्यांनाच बॅग्स दिल्या जाणार होत्या. शिवाय विद्यार्थ्यांना खेळण्यांवर पास दाखवून मोफत खेळता येणार होते.

परंतु, विद्यार्थी तिथं गेल्यानंतर त्यांना फक्त एका पासवर एकाच झुल्यावर खेळू दिल्याचं विद्यार्थी सांगतात. शिवाय विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या पासेस या झुल्यावर बसविताना परत मागण्यात आल्यात. सारंग गोडबोले म्हणतात, बॅग्स कमी पडल्या. तेवढ्या बॅग्स तयार नव्हत्या. त्यामुळं आम्ही त्यांना नंतर देणार आहोत. पण, दोन हजार पासेस कशाला वितरित केल्या असा सवाल पालक विचारताहेत.

सारंग गोडबोले आमचा फोनचं उचलेना

काही विद्यार्थ्यांच्या बॅग्स त्यांच्या शिक्षकांकडं देण्यात आल्या. पण, बऱ्याचं विद्यार्थ्यांना तुमच्या शाळेत बॅग्स पाठविणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळं हिरमुसले होऊन विद्यार्थी परत आले. ज्या कामासाठी आपण गेलो ते काम न झाल्यानं पालक नाराज होऊन परत आले. मनपा शाळेत शिकणाऱ्या पालकांचे वडील मजूर वर्गातील आहेत.

असे पालक रोजी सोडून मुलांच्या आग्रहाखातर रेशीमबाग मैदानावर गेले होते. त्यांचा तिथं हिरमोड झाला. विद्यार्थी आम्हाला बॅग्स केव्हा मिळणार म्हणून विचारतात. मी त्यांना काय उत्तर देऊ. सारंग गोडबोले हे माझा फोनचं उचलत नाहीत, अशी माहिती दुर्गानगर माध्यमिक शाळा प्रशासनानं दिली.

आम्ही अॅडजस्ट करून देणार, पण केव्हा?

विद्यार्थ्यांना शाळेत बॅग्सविषयी चौकशी केली. पण, सुमारे एक महिन्याचा कालावधी होऊनही अद्याप त्यांना बॅग्स मिळाल्या नाहीत. यासंदर्भात आमदार मते यांच्या वतीनं हे काम पाहणारे सारंग गोडबोले यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संपर्क साधला. तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरं देत होते. आम्ही ते अॅडजस्ट करून देणार आहोत, असं सांगत होते. पण, केव्हा याची निश्चित तारीख त्यांनी सांगितली नाही.

दिवाळीनंतर होईल का बॅग्स वितरण?

दुर्गानगर माध्यमिक शाळेतील 114 विद्यार्थी या मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यापैकी एकाही विद्यार्थ्याला अद्याप बॅग मिळाली नाही. सारंग गोडबोले यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितलं की, दोन हजार विद्यार्थ्यांना पास दिल्या होत्या. पण, दीड हजाराचं बॅग्स उपलब्ध झाल्या.

त्यामुळं पाचशे विद्यार्थ्यांना नंतर बॅग्स देणार आहोत. पण, मोदींचा वाढदिवस होऊन एक महिना उलटला तरी अद्याप मुलं बॅग्सच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळी गेल्यानंतरतरी या बॅग्स मिळतील का, असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केलाय.

400 पासेस, बॅग्स 200 चं

अशीच काहीसी परिस्थिती ही लालबहाद्दूर शास्त्री शाळेतील विद्यार्थ्यांची आहे. या शाळेतील चारशे विद्यार्थ्यांना पासेस दिल्या गेल्या होत्या. त्यापैकी दोनशे विद्यार्थ्यांना बॅग्स दिल्या गेल्या. बाकी दोनशे विद्यार्थी अद्याप बॅग्सची प्रतीक्षा करत आहेत. या दोन्ही शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक सारंग गोडबोले यांना फोन करतात.

तेव्हा सारंग गोडबोले हे फोन उचलत नसल्याचा आरोप दुर्गानगर शाळा प्रशासनानं केलाय. तर बॅग्स तयार होतील, तेव्हा देऊ, असं सारंग गोडबोले यांनी लालबहाद्दूर शाळेतील शिक्षकांना सांगितलं. आम्ही आशा सोडली असल्याचं लालबहाद्दूर शाळेतील मुख्याध्यापक म्हणाले.

500 विद्यार्थी, 500 पालकांना धरले वेठीस

सारंग गोडबोले यांनी 500 विद्यार्थी व त्यांच्या 500 पालकांना वेठीस धरले आहे. गेल्या महिन्याभरापासून ते हुलकावणी देत आहेत. सारंग गोडबोले यांच्या म्हणण्यानुसार, जर एकावेळी दोन हजार बॅग्स उपलब्ध नव्हत्या. तर तेवढ्या पासेस विद्यार्थ्यांना का दिल्या. कार्यक्रमात गर्दी जमविण्यासाठी गरीब विद्यार्थी व पालकांना बोलावले होते का? हे हजार जण जेव्हा कार्यक्रमात गेले. तेव्हा पाचशे जणांचा रोजगार बुडाला.

कामधंदे सोडून पालक मुलांच्या हौसेखातर तिथं गेले. तिथं गेल्यानंतर पालकांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. काही जण किरायानं ऑटो करून, तर काही जण स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. पण, पासेस असूनही पाचशे विद्यार्थी परत आले. अद्याप त्यांना या बॅग्स मिळालेल्या नाहीत. त्यामुळं विद्यार्थी, पालकांच्या मनात आमदार मोहन मते, आणि भाजपविषयी प्रचंड नाराजी आहे.

ती नावं नंतर आलेली – आमदार मोहन मते

यासंदर्भात आमदार मोहन मते यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, आमचा 500 बॅग्स देण्याचं ठरलं होतं. पण, नंतर मुलांची संख्या वाढली. त्यामुळं जास्त बॅग्स वितरित करणं शक्य झालं नाही. शिवाय विद्यार्थ्यांना पासेस दिल्या गेल्या नव्हत्या, असंही आमदार मते म्हणाले. नंतर आलेली नाव आहेत. त्या याद्या नंतर आल्या होत्या असं आमदार मते यांनी सांगितलं. हा काही शासकीय कार्यक्रम होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.