विदर्भातल्या काही जिल्ह्यांत कोरोनाचं वाढतं प्रमाण, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, आरोग्य यंत्रणेची झाडाझडती

कोव्हिड संसर्गाचे रुग्ण पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोव्हिड रूग्णसंख्या वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं आहे.

विदर्भातल्या काही जिल्ह्यांत कोरोनाचं वाढतं प्रमाण, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, आरोग्य यंत्रणेची झाडाझडती
बुलडाणा विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 10:55 PM

बुलडाणा : कोव्हिड संसर्गाचे रुग्ण पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये कोव्हिड रूग्णसंख्या वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं, यासाठी विविध जनजागृती करत आहे तर जे लोक नियमांचं पालन करत नाहीत, त्यांच्याविरोधात प्रशासन कडक पावलं उचलत आहे. (Increase the number of corona Patient In Vidarbha Region Administration Action Mode)

कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची ट्रेसिंग करा

आरोग्य यंत्रणेने यंत्रणेने बाधित रूग्णाच्या निकट व बाह्य संपर्कातील व्यक्ती ट्रेस करून कोरोना चाचणी करावी. कोव्हिड नियंत्रणासाठी कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवून कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना बुलडाणा विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते.

कोव्हिड केअर सेंटरलाच रुग्णांची भरती करा

स्वॅब घेण्याचे प्रमाण जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये वाढविण्याचे आदेश देत ग्रामीण भागातही स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील कुणीही सुटता कामा नये. बाधित रूग्णांना कोव्हिड केअर सेंटरलाच भरती करून घ्यावी, असे महत्त्वाचे निर्देश यावेळी देण्यात आले.

होम आयसोलेशनची सुविधा बंदच ठेवा

होम आयसोलेशनची सुविधा बंदच ठेवावी. होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा. जेणकरून सदर बाधीत रूग्ण बाहेर फिरत असल्यास दिसून येईल. ज्या रूग्णांकडे विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था आहे, अशा रूग्णांना होम आयसोलेशन दिले असल्यास त्यांच्या घरावर विलगीकरण केल्याच्या तारखेसह स्टीकर चिकटवावे.

आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करा

आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांचे टेस्टींग करून घ्यावे. कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा असाव्यात. जेवणाचा दर्जा चांगला ठेवावा. स्वच्छतेच्या बाबत कुठलीही तडजोड नसावी. दुर्धर आजाराने ग्रस्त रूग्णांचे आठवड्याला तपासणी करून घ्यावी.

आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे

आरोग्य यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण करून घ्यावे. सुपर स्प्रेडरच्या कोविड चाचण्या बंधनकारक कराव्यात. शासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित कोरोना चाचण्या कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंगचा नियम पाळावा व हात वारंवार धुवावे या त्रिसुत्रींचं कटाक्षाने पालन झाले पाहिजे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

(Increase the number of corona Patient In Vidarbha Region Administration Action Mode)

हे ही वाचा :

प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना…? चित्रा वाघ यांचा सवाल

Vijay Wadettiwar Corona | मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण, अधिवेशनाला हजेरी

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.