Nagpur swine flu : नागपुरात 8 दिवसांपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या, आतापर्यंत 75 रुग्ण सापडले, प्रतिबंधासाठी 5 हजार इन्फल्यूएंझा लसमात्रा

इन्फल्यूएन्झा लसीकरण हे ऐच्छिक व मोफत आहे. मनपाच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे.

Nagpur swine flu : नागपुरात 8 दिवसांपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या, आतापर्यंत 75 रुग्ण सापडले, प्रतिबंधासाठी 5 हजार इन्फल्यूएंझा लसमात्रा
प्रतिबंधासाठी 5 हजार इन्फल्यूएंझा लसमात्रा
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 7:01 PM

नागपूर : कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लू या आजाराचे सुद्धा रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिबंधासाठी शहरात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा संचालनालयाद्वारे नागपूरला 5 हजार इन्फल्युएंझा लसमात्रा प्राप्त झालेल्या आहेत. ही लस सध्या अतिजोखमीच्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. (Radhakrishnan B) यांच्या निर्देशानुसार लवकरच शहरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे (Dr. Govardhan Navkhare) यांनी दिली आहे. नागपूर शहरामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. याशिवाय शहरात स्वाईन फ्लू बाधित चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये एक स्त्री व तीन पुरूष आहेत. मृतकांमध्ये तिघे नागपूर शहरातील आहेत तर एक शहराबाहेरील असल्याची नोंद आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूपासून संरक्षणासाठी शासनाद्वारे प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात करण्यात येत आहे.

इन्फल्यूएन्झा लसीकरण हे ऐच्छिक व मोफत

सुरुवातीला अतिजोखमीच्या व्यक्तींनाच लस देण्यात येणार आहे. यामध्ये दुस-या आणि तिस-या तिमाहितील गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणारे व्यक्ती, फ्लू रुग्णांची तपासणी, देखभाल आणि उपचारात सहभागी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांना इन्फल्युएंझा लस दिली जाईल. इन्फल्यूएन्झा लसीकरण हे ऐच्छिक व मोफत आहे. मनपाच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात इन्फल्यूएन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो. याप्रकारे मिळालेली प्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत टिकून राहू शकते. त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक ठरते.

अधिक माहितीसाठी साधा संपर्क

लसीकरणामुळे काही जणांना ताप येणे, थकवा, ॲलर्जी, इंजेक्शनच्या जागी सूज येणे, अंग खाजविणे, डोकेदुखी, घाम येणे, स्नायू-सांध्यांमध्ये वेदना अथवा इतर प्रकारचा त्रास होउ शकतो. त्यामुळे अशा प्रतिक्रिया उद्भवल्यास लसीकरण घेतलेल्या लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात येत आहे. अधिक माहितीकरीता 9175414355 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क करावा.

हे सुद्धा वाचा

स्वाईन फ्लू टाळण्याकरिता हे करा

हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत. गर्दीमध्ये जाणे टाळा. स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान 6 फूट दूर रहा. खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा. भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी. पौष्टीक आहार घ्यावा.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.