नागपूर जिल्ह्यामध्ये आरंभ बालसंगोपन प्रशिक्षण; 0 ते 3 वयोगटातील मुलांच्या वाढीसाठी शास्त्रीय उपक्रम

बालकांची प्रगती बघीतली तर वाढ ही मोजता येते. आणि विकास हा निरंतर राहणार आहे. हा विकास वयाच्या शेवटच्या वयापर्यंत आणि शिक्षण पालकांना बघायला दिसणार आहे. हे या आरंभ प्रशिक्षणाचा महत्वाचा गाभा आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये आरंभ बालसंगोपन प्रशिक्षण; 0 ते 3 वयोगटातील मुलांच्या वाढीसाठी शास्त्रीय उपक्रम
नागपूर जिल्हा परिषद
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 4:00 AM

नागपूर : मातृत्व, पितृत्व स्वीकारायचे असेल तर जन्माला येणाऱ्या बाळाबद्दलची जबाबदारी समजून घेणे आवश्यक असते. कारण शून्य ते तीन वयोगटातच बालकाचा भावनिक, शारीरिक, बौद्धिक विकास होत असतो. नागपूर जिल्ह्यातील (Nagpur district) अशा शून्य ते तीन वयोगटातील मुलांच्या महत्तम वाढीसाठी आरंभ नावाचा उपक्रम सुरू झाला आहे. बालवयात संस्कार (Childhood rites) याबाबतचे महत्व सर्व धर्मशास्त्रामध्ये नमूद आहे. मात्र बाळाचा जन्म उत्सव म्हणून साजरा करणारी संस्कृती त्याच्या बालवयातच त्यातही शून्य ते तीन वयोगटातच आवश्यक काळजी घेत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे बालकाच्या उत्तम बौद्धिक विकास (growth of children) होण्यासाठी भावनिक दृष्ट्या तो सक्षम होण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने आपले कर्तव्य बजावावे यासाठीचे नियम जबाबदारी, यासोबतच तांत्रिक सल्ला देण्याचे काम या उपक्रमात केले जाणार आहे. बालकांची वाढ आणि विकास यातील फरक संवेदनशील पालकत्व, प्रतिसादात्मक कुटुंबाचा सहभाग खेळ, संवाद, कृती या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा. तसेच सुरक्षित वातावरण, आहार आरोग्य व स्वच्छता यावर प्रशिक्षण देण्यात आले.

बालकांचे सुरवातीचे क्षण मोलाचे

आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे, नागपूर जिल्हा परिषद महिला बाल कल्याण विभागा अंतर्गत नुकतेच आरंभ प्रशिक्षण चार दिवशीय आयोजित केले होते. हे प्रशिक्षण एकात्मिक बालविकास कौशल्य पर्यवेक्षिका, गावागावातील सेविका, आशा वर्कर, आशा गटप्रवर्तक यांना देण्यात येणार आहे. हे आरंभ प्रशिक्षण महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवा ग्राम आणि युनिसेफ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुबोध गुप्ता प्राचार्य प्रकल्प इन्वेस्टिगेटर यांच्या आरंभ रिसर्च अभ्यासक्रमातून 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांसाठी आहे. हे वय बालकांचे अत्यंत महत्त्वाचे आहे. या वयातच बालकांची वाढ आणि विकास यातील फरक समजावून सांगितले आहे. आरंभ प्रशिक्षणामध्ये बालकांचे सुरवातीचे क्षण किती मोलाचे आहे. बालकांना खेळणी नको, खेळ हवा. पालक आणि सामाजिक परिसरातील सर्व सदस्य यांच्या सक्रिय सहभागाने प्रशिक्षणातून आरंभ गावातील सामान्यातील सामान्य परिवाराला कळेल, असे मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषत: यात पालक आणि आजी, आजोबा यांचा महत्वाचा सक्रिय सहभाग कृतीशिल राहणार आहे.

बालकाप्रमाणे कुटुंबाचा सहभाग वाढावा

यामध्ये पालकांनी मुलांना खेळ आणि वेळ देण्याची गरज का आहे हे जर समजले आरंभच्या माध्यमातून तर पालकांना पुढे पश्चात्ताप करण्याची वेळच येणार नाही. वयोगटानुसार मेंदूला चालना देणारे खेळ व संवाद कृती, संवेदनशिल पालकत्व, भौतिक आणि कौटुंबिक, सुरक्षित वातावरण. आरोग्य विषयक संदेश, विशेष गरजा असणारी बालके हेसुद्धा वेगळे नाही. त्यांनाही इतर बालकाप्रमाणे कुटुंबाचा सहभाग वाढावा. यासाठी सुद्धा आरंभ घराघरात काम करणार. आवश्यकतेनुसार आहार. गृहभेटीमध्ये घरातील सर्वांचा सहभाग. आणि पालक सभा, पालक मेळावा हे आरंभ प्रशिक्षणचा महत्वाचा भाग आहे.

प्रशिक्षण आता गावागावात पोहचणार

जिल्हा परिषदेमध्ये नुकतेच या प्रशिक्षणाचा समारोप झाला. या समारोप प्रसंगी उपस्थित मुख्यकार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिव्यांग बालकांचे सुरुवातीपासून निदान होण्याच्या दृष्टिकोनातून लक्ष ठेवण्यासाठी पालक व पर्यवेक्षिकांना आवाहन केले. उपमुख्यकार्यपालन अधिकारी भागवंत तांबे, आरंभ टिमचे जिल्हा संपर्क अधिकारी अतुल कातरकर, जिल्हा संपर्क अधिकारी सम्राट खंडार, राज बसेकर यांची यावेळी उपस्थिती होती. ज्यांनी अत्यंत कृती शिल, संवेदनशील प्रशिक्षण दिले अशा मास्टर ट्रेनर संगिता चंद्रिकापुरे, सिमा धुर्वे, मनीषा भुरचंडी, ज्योती रोहणकर, चित्रा घडे आणि सर्व प्रशिक्षणार्थी पर्यवेक्षिका यांच्यामार्फत हे प्रशिक्षण आता गावागावात पोहचणार आहे.

नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी देणार; आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांचे आश्वासन

Nagpur Collector | महिला धोरणासाठी प्रस्ताव सादर करा; नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Nagpur Congress | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात, काँग्रेस कोणत्याही हल्ल्याचे समर्थन करत नाही

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.