Dr. Meshram | नागपुरातील डॉक्टरांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल; मेंदूरोग तज्ज्ञांच्या सर्वोच्च संस्थेचे कसे झाले विश्वस्त?

नागपूर शहरातील प्रख्यात मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची World Federation of Neurology (WFN)विश्‍वस्त म्हणून नेमणूक झाली. नागपूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. यासाठी डॉ. मेश्राम यांना बराच संघर्ष करावा लागला.

Dr. Meshram | नागपुरातील डॉक्टरांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल; मेंदूरोग तज्ज्ञांच्या सर्वोच्च संस्थेचे कसे झाले विश्वस्त?
मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 6:35 AM

नागपूर : वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी ही जगातील 122 देश सदस्य असलेली मेंदू रोग तज्ज्ञांची सर्वोच्च आणि एकमेव संस्था आहे. World Federation of Neurology (डब्लूएफएन)ची स्थापना 1957 मध्ये झाली. नागपुरातील डॉ. चंद्रशेखर मेश्राम हे देशातील पहिले मेंदू रोग तज्ज्ञ आहेत ज्यांची विश्वस्त या प्रतिष्ठित पदासाठी नेमणूक झाली आहे. ते डब्लू एफएनच्या पाच विश्‍वस्तांपैकी एक आहेत. ब्लूएफएनच्या कार्यकारिणीत आशियातील एकमेव प्रतिनिधी आहेत. ऑस्ट्रियातील डॉ. वुल्फगँग ग्रिसोल्ड हे डब्लूएफएनचे अध्यक्ष आहेत. डब्लूएफएनचे ध्येय न्यूरोलॉजी शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणाद्वारे जगभरात गुणवत्तापूर्ण न्यूरोलॉजी आणि मेंदूचे आरोग्य वाढवणे आहे. डॉ. मेश्राम हे डब्लूएफएनमध्ये अविकसित आणि विकसनशील देशांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशॉलिटी ग्रुपचे अध्यक्ष

इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचे सचिव आणि अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पदार्पण केले. ते 2017 पासून डब्लूएफएनच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशॉलिटी ग्रुपचे अध्यक्ष आहेत. अलीकडेच त्यांची या पदावर दुसर्‍यांदा निवड झाली आहे. यापूर्वी त्यांनी डब्लूएफएनच्या संविधान आणि पोट कायदा समितीचे सदस्य म्हणून 6 वर्षे आणि वैज्ञानिक कार्यक्रम समितीचे सदस्य म्हणून 4 वर्षे काम केले आहे. बँकॉक, माराकेश, स्टॉकहोम, व्हिएन्ना, सँटियागो, क्योटो आणि दुबई येथे डब्लूएफएनच्या कौन्सिल ऑफ डेलिगेट्सच्या बैठकीसाठी त्यांनी सात वेळा राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले.

डॉ. मेश्राम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

डॉ. चंद्रशेखर मेश्राम जर्नल ऑफ न्यूरोसायन्सेसच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजीवरील विशेष अंकाचे सहसंपादक आहेत. ते एन्सायक्लोपेडिया ऑफ न्यूरोसायन्सच्या तिसर्‍या संस्करणाकरिता जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग आणि ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे विभाग संपादक आहेत. इंडियन अॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या सार्वजनिक आरोग्य शिक्षण आणि जनजागरण उपक्रमांचे ते मुख्य समन्वयक आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

NMC Election | नागपूर भाजपात कोण करतंय गुलाम बनविण्याचा प्रयत्न; अविनाश ठाकरे यांच्या पोस्टने खळबळ, पोस्ट नेमकी काय?

Gondia ZP Election | प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; काँग्रेसच्या नाना पटोले यांनाही धक्का!

Bhandara ZP Election | भंडाऱ्यात 21 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेच्या समीकरणासाठी काय करावं लागणार?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.