Kapil Dev Video : कपिल देव यांच्या बॉलिंगवर नितीन गडकरींचा सिक्सर, नागपूरच्या खासदार क्रीडा महोत्सवातील धमाल व्हिडिओ

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव नितीन गडकरी आणि फडणवीस यांनी बॉलिंग केली तर कपिल देवने प्रेक्षकांमध्ये फटकर लागवत प्रेक्षकांची मनं जिंकली गडकरींनी सुद्धा कपिल देव यांच्या बॉलिंग वर चांगलेच फटके, लगावले यामुळे या कार्यक्रमात पूर्णपणे खेळमय वातावरण झालं.

Kapil Dev Video : कपिल देव यांच्या बॉलिंगवर नितीन गडकरींचा सिक्सर, नागपूरच्या खासदार क्रीडा महोत्सवातील धमाल व्हिडिओ
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 12:03 AM

नागपूर : आज नागपुरात पुन्हा कपिल देव (Kapil Dev) यांना बॅट पकडताना पाहून सर्वांनाच हुरूप भरला. मात्र समोर बॅटिंगची धुराही नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) संभाळली होती. इकडून कपिल देव यांनी बॉल टाकला तसा गडकरींनी पुढे येत जोरदार छटकार लगावला. ही धमाल रंगली होती आज नागपुरातल्या एका कार्यक्रमात. नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा आज समारोप झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव उपस्थित होते, प्रेक्षकांच्या आग्रहास्तव नितीन गडकरी आणि फडणवीस यांनी बॉलिंग केली तर कपिल देवने प्रेक्षकांमध्ये फटकर लागवत प्रेक्षकांची मनं जिंकली गडकरींनी सुद्धा कपिल देव यांच्या बॉलिंग वर चांगलेच फटके, लगावले यामुळे या कार्यक्रमात पूर्णपणे खेळमय वातावरण झालं. त्यामुळे या ठिकाणी जमलेल्या लोकांना कपिल देव यांना खेळताना पुन्हा पाहता आलं.

गडकरींच्या बॅटिंगची जोरदार चर्चा

चांगले खेळाडू घडले पाहिजे

गेल्या पंधरा दिवसापासून नागपुरात क्रीडा महोत्सव आयोजित होत आहे. यामध्ये वेगवेगळ्या खेळांचे आयोजन शहरातील वेगवेगळे मैदानात करण्यात आले होते. याचा आज समापन झालं अनेक खेळाडूंनी यामध्ये प्रावीण्य प्राप्त केलं. त्यांना पुरस्कार सुद्धा देण्यात आले त्याचप्रमाणे नागपूरच्या खेळात मोठे योगदान असणारे बबनराव तायवाडे यांना क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा माणसाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे सोबतच देशात चांगले खेळाडू घडले पाहिजे, यासाठी हे आयोजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून करण्यात आलं होतं यावेळी गडकरींनी खेळाडूंना अभिनंदन करत पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी गडकरी म्हणाले .

पुढच्या वर्षी बक्षीस वाढवणार

यावर्षी 93 लाखाचे पुरस्कार दिले पुढच्या वर्षी आणखी पुरस्कार वाढविण्यात येईल , एक दोन खेळ आम्ही खेळवू शकलो नाही याचा मला खेद आहे कारण काही असोशियशनमध्ये झगडे होते अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खेळाळूना शुभेछ्या देत हा फक्त क्रीडा महोत्सव नाही तर सेलिब्रेशन आहे ज्या माध्यमातून खेळाळूना प्रोत्साहन मिळते .ज्या विजेत्याला कपिल देव यांच्या सारख्या व्यक्ती कडून पुरस्कार मिळतो तो पुरस्कार मोठा होतो, असेही ते म्हणाले, तसेच खासदार क्रीडा मोहत्सव हा नवीन खेळाळूना प्रोत्साहन देणारा असून यातून अनेक चांगले खेळाळू पुढे येणार हे निश्चित असेही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.