आता जिल्हा बँकेमध्येही महाविकास आघाडी पॅटर्न, मात्र, ‘या’ जिल्ह्यात काँग्रेस मोठा भाऊ
यवतमाळ जिल्हा बँकेमध्ये महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्यात येणार आहे. इथं काँग्रेस मोठा भाऊ असेल. Maha Vikas Aghadi Pattern
यवतमाळ: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. हाच महाविकास आघाडीचा पॅटर्न यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसून येत आह. यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीची बैठक रेमंड रेस्ट हाऊस येथ ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवनिर्वाचित संचालकांची मते जाणून घेण्यात आली. ( Maha Vikas Aghadi Pattern implemented in Yavatmal DCC Bank Congress Get Chairman Post)
काँग्रेस मोठा भाऊ
यवतमाळचे पालकंमत्री आणि वनमंत्री संजय राठोड, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या उपस्थित बैठक झाली. यामध्ये सर्व नवनिर्वाचित संचालकांची मतं जाणून घेण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्ष व दोन उपाध्यक्ष बनविण्याबाबत एकमत झाले. प्रत्येक पक्षाने एक पद घेण्याबाबत चर्चा झाली असून यवतमाळमध्ये काँग्रेस मोठ्या भावाची भूमिका बजावणार आहे. काँग्रेसकडे अध्यक्षपद दिले जाणार असून एक उपाध्यक्षपद शिवसेनेला आणि एक राष्ट्रवादी कॉग्रेसला दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोमवारी ( 4 जानेवारी) अंतिम निर्णय
यवतमाळ जिल्हा बँकेंच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांची सोमवारी सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. महाविकास आघाडी समोर भाजप प्रणित शेतकरी आघाडीचं आव्हान आहे.
यवतमाळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल 22 डिसेंबर रोजी लागला. यामध्ये महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. महाविकास आघाडीनं 21 पैकी 15 जागांवर विजय मिळवला तर भाजपनं 3 जागा तर अपक्षांनी 3 जागांवर विजय मिळवला. यामुळे महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ जिल्हा बँक निवडणुकीतही मतदारांनी कौल दिल्याचे दिसून आले. काँग्रेसनं सर्वाधिक 11 जागांवर विजय मिळवला आहे.
सात जिल्हा बँकांच्या निवडणूका लवकरच
राज्यातील सात जिल्हा बँकासह काही सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अहमदनगर, बीड , नांदेड, गडचिरोली, अकोला, औरंगाबाद आणि परभणी जिल्हा बँकाची निवडणूक लागणार आहे. सोमवार 4जानेवारी 202 पासून या संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थांच्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी याबाबत माहिती दिली होती.
संबंधित बातम्या:
साताऱ्यातील अंगापूर तर्फ तारगावमध्ये महिलाराज, ज्येष्ठ नागरीक आणि तरुणाईचा निर्धार
आधी बिनविरोध निवडीचे फ्लेक्स, नंतर निवडणुकीची तयारी; ‘या’ ग्रामपंचायतीचा गोंधळात गोंधळ
( Maha Vikas Aghadi Pattern implemented in Yavatmal DCC Bank Congress Get Chairman Post)