AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahajyoti | जे कृषी विद्यापीठाला जमलं नाही ते महाज्योतीनं केलं; काय आहे हा 15 हजार एकरवरील प्रकल्प?

या प्रकल्पाअंतर्गत महाज्योती शेतकऱ्यांकडून करडई खरेदी करणार आहे. त्यावर प्रक्रिया करून महाज्योती स्वतः करडई तेलाचा ब्रॅंड तयार करणार अशी माहिती महाज्योतीचे एमडी प्रदीप डांगे यांनी दिलीय.

Mahajyoti | जे कृषी विद्यापीठाला जमलं नाही ते महाज्योतीनं केलं; काय आहे हा 15 हजार एकरवरील प्रकल्प?
नागभिड येथील करडईचे लाभार्थी शेतकरी.
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 12:40 PM

नागपूर : विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात पर्यायी पीक देण्यात जे कृषी विद्यापीठाला यशस्वीरित्या जमलं नाही, ते आता ओबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांसाठी सुरु झालेल्या महाज्योतीने सुरु केलंय. महाज्योतीने विदर्भातील 15 हजार एकरवर प्रायोगिक तत्त्वावर करडईचा प्रकल्प सुरु केलाय.

9 हजार शेतकऱ्यांना करडईचं बियाणं

यातून 9 हजार शेतकऱ्यांना मोफत करडईचं बियाणं दिलंय. यंदा रब्बीत विदर्भातील बुलडाणा, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात करडईची पेरणी झालीय. या प्रकल्पाअंतर्गत महाज्योती शेतकऱ्यांकडून करडई खरेदी करणार आहे. त्यावर प्रक्रिया करून महाज्योती स्वतः करडई तेलाचा ब्रॅंड तयार करणार अशी माहिती महाज्योतीचे एमडी प्रदीप डांगे यांनी दिलीय.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल

महाज्योतीच्या उद्दिष्टांमध्ये ओबीसी, व्हीजेएनटीच्या मुलांना स्पर्धा परीक्षेला तयार करण्यासोबतच, शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवणंही आहे. तेच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाज्योती विदर्भात करडई लागवडीचा पायलट प्रोजेक्ट राबवत आहेत. यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असा विश्वास डांगे यांनी व्यक्त केलाय.

करडई लागवडीसाठी अनुदान

लीलाधर बावनकर हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील पाहारनी येथील रहिवासी आहेत. यांच्याकडं वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. त्यामध्ये हे पारंपरिक पद्धतीनं शेती करत होते. परंतु, पाहिजे तसा नफा मिळत नव्हता. त्यामुळं ते कृषी विभागाकडं गेले. तिथून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी करडई या पिकाची लागवड केली. महाज्योती संस्थेनं यासाठी त्यांना मदत केली. करडई लागवडीसाठी एकरी बावीसशे रुपये मदत देण्यात आली. याचा उपयोग त्यांनी शेतीची मशागत, खत-बी-बियाणांसाठी केला. अशाच प्रकारे इतर शेतकऱ्यांनाही करडई लागवडीसाठी अनुदान देण्यात येत आहे.

The Kidtastic Bhagavad Gita | नागपुरातील दहा वर्षांच्या काव्य अग्रवालने उलगडला भगवद् गीतेचा अर्थ; समजून घ्या किडटास्टिक गीतेत काय लिहिले?

Cancer Institute | भीती कॅन्सरची! नागपुरातील इन्स्टिट्यूटच्या बांधकामाला गती द्या; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांनी घेतला आढावा

Crime | तेलंगणातून येत होता नागपुरात गांजा, बुटीबोरीत पोलिसांनी रचला सापडा; सात लाखांचा गांजा जप्त

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...