नागपुरात महसूल विभागाचे महाराजस्व अभियान; फेरफार अदालत शुक्रवारी, नेमकी कोणती कामे होणार?

नागपुरात महाराजस्व अभियान शुक्रवारी राबविण्यात येत आहे. फेरफार अदालतकरिता झिंगाबाई टाकळी, दाभा, बोरगाव, गोरेवाडा, मानकापूर, पोलीस लाईन टाकळी, जरीपटका असा भाग निवडण्यात आलाय. अर्जदारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन नगर भूमापन अधिकारी स्वप्ना पाटील यांनी केलंय.

नागपुरात महसूल विभागाचे महाराजस्व अभियान; फेरफार अदालत शुक्रवारी, नेमकी कोणती कामे होणार?
नागपुरातील नगर भूमापन कार्यालय.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 3:07 PM

नागपूर : राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानांतर्गत (Maharajaswa Abhiyan) 18 फेब्रुवारीला शुक्रवारी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आलंय. नगर भूमापन अधिकारी (Nagar Survey Officer) क्रमांक तीन नागपूर, सहावा माळा, प्रशासकीय इमारत क्रमांक एक, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर येथे फेरफार अदालतीचे (Ferfar Adalati) आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षभरापासून नगर भूमापन विभागाकडील फेरफार ऑनलाईन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मिळकत पत्रिका अद्ययावत झाल्या नाहीत. तसेच सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणीमुळे व कोविडच्या लॉकडाऊनमुळे मुदतबाह्य प्रलंबित फेरफार प्रकरणांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळं नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. सर्व प्रकरणे निकाली काढण्याकरिता शासनानी महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानांतर्गत फेरफार अदालतीची आयोजन करण्यासबंधी पत्रक जारी केले आहे.

खालील पत्त्यावर साधा संपर्क

मुदतबाह्य प्रकरणावर अंतिमत: कार्यवाही करण्याकरिता अर्जदार यांच्याकरिता फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. फेरफारसबंधी नगर भूमापन क्र. तीनमध्ये अर्ज केलेल्या अर्जदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर भूमापन अधिकारी स्वप्ना पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता 0712- 2520263 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे. फेरफार अदालतकरिता झिंगाबाई टाकळी, दाभा, बोरगाव, गोरेवाडा, मानकापूर, पोलीस लाईन टाकळी, जरीपटका हा भाग निवडण्यात आलाय.

कोणत्या सुविधा पुरविण्यात येणार

फेरफार अदालतमध्ये खालील सुविधा पुरविण्यात येणार आहेत. प्रलंबित प्रकरणाबाबत येणाऱ्या अर्जदार यांच्या अर्जाबाबत स्थिती सांगणे. त्रुटी असणाऱ्या प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्वरित कार्यवाही करण्यात येईल. अर्जदार यांना फेरफार मंजुरीकरिता नमुना नऊ नोटीस प्राप्त होऊन मुदत संपली असल्यास प्रकरणाची तत्काळ तपासणी करून त्वरित फेरफार मंजूर करण्यात येईल. ईपीसीआयएस ऑनलाईन फेरफार प्रणाली, मिळकत पत्रिका डाउनलोड करणे, डिजिटल फेरफार प्रणाली यांची माहिती पुरविण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे. नागपुरात महाराजस्व अभियान शुक्रवारी राबविण्यात येत आहे. फेरफार अदालतकरिता झिंगाबाई टाकळी, दाभा, बोरगाव, गोरेवाडा, मानकापूर, पोलीस लाईन टाकळी, जरीपटका असा भाग निवडण्यात आलाय. अर्जदारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन नगर भूमापन अधिकारी स्वप्ना पाटील यांनी केलंय.

Nagpur Corona | कोरोनाचे निर्बंध धाब्यावर, कोचिंग क्लासेस सुरू, मनपाने काय केली कारवाई?

Nagpur | आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेचा समारोप; भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी

आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू काय करतो माहीत आहे का?, वाचा नागपुरातील दिव्यांग खेळाडूचा जीवन संघर्ष

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.