Anil Deshmukh : नागपुरात राजकारण चिघळलं, गाडीवर दगडफेक, अनिल देशमुख जखमी

अनिल देशमुख शेवटची सांगता सभा आटोपून ते आपल्या घरी काटोलला परतत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगड फेकला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला.

Anil Deshmukh : नागपुरात राजकारण चिघळलं, गाडीवर दगडफेक, अनिल देशमुख जखमी
अनिल देशमुखImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 9:47 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. पण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विधानसभा निवडणुकीला गालबोट लागण्याची घटना घडली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अनिल देशमुख यांचे चिरंजीव हे काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांची शेवटची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख आपल्या घरी काटोलला परतत असताना अज्ञात व्यक्तीने देशमुखांच्या गाडीवर दगड फेकला.

अनिल देशमुख यांच्यावर काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला. या दगडफेकीत देशमुख जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजपकडून अनिल देशमुख यांचा हा स्टंट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी सहानुभूती मिळावी यासाठी स्वत:वर हल्ला घडवून आणला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

अनिल देशमुखांचा जखमी अवस्थेतला व्हिडीओ समोर

अनिल देशमुख यांचा हल्ल्यानतंरचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओत अनिल देशमुख गाडीत जखमी अवस्थेत दिसत आहेत. त्यांचं डोकं फुटल्याने, डोक्यातून रक्त येत असल्याने अनिल देशमुखांच्या डोक्याला रुमाल गुंडाळलेला बघायला मिळाला. या घटनेमागे नेमकं कोण आहे? ते अद्याप समोर आलेलं नाही. पण भाजपकडून अनिल देशमुख यांच्यावर टीका करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी स्वत:च्या लोकांकडून दगडफेक करायला लावली असू शकते, असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. दरम्यान, या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, काटोल विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे उमेदवार आहेत. तर भाजपकडून या मतदारसंघात चरनसिंग ठाकूर हे उमेदवार आहेत. या निवडणुकीत दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे आता दोघांपैकी कुणाला संधी द्यायची याचा निर्णय आता मतदार 20 तारखेला घेणार आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.