Maharashtra Winter Session 2022 Live : अधिवेशनात आरोप-प्रत्यारोप सुरूच, आज आणखी एका मंत्र्याबाबत गौप्यस्फोट होणार?
Maharashtra Winter Session 2022 Live : अधिवेशनात आरोप-प्रत्यारोप सुरूच, आज आणखी एका मंत्र्याबाबत गौप्यस्फोट होणार?
मुंबई: गेल्या सहा दिवसांपासून राज्य हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली आहे. आजही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर विरोधक आज आणखी एका मंत्र्याबाबत गौप्यस्फोट करणार आहेत. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
औरंगाबादमध्ये दोन गटांत हाणामारी
औरंगाबादच्या कॅनॉट प्लेसमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
जमावाने तीन तरुणांना केली बेदम मारहाण
कंबरेचे बेल्ट आणि लाठ्यांनी मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
-
अहमदनगर- जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीला जन्मठेप
स्वामी उर्फ गोविंद दत्तात्रय गायकवाड असं जन्मठेप झालेल्या आरोपीचं नाव
तर १३ जणांची सबळ पुराव्यांअभावी सुटका, श्रीगोंदा सत्र न्यायालयाचा निकाल
राजकीय वर्चस्वादातून योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या दोन तरुणांची गोळ्या घालून केली होती हत्या
28 एप्रिल 2018 रोजी घडली होती ही घटना , राजकीय शुभेच्छाचा पोस्टर फाडल्याच्या रागातून झाली होती हत्या
-
-
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर मोठी बातमी
महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात समन्वयासाठी समिती स्थापन केली जाणार,
कर्नाटकचे तीन मंत्री आणि महाराष्ट्राचे तीन मंत्री असणार समितीत,
अधिवेशनानंतर समितीची स्थापना केली जाणार,
समितीचे अध्यक्ष अधिवेशनानंतथ ठरणार,
मात्र वाद नको समन्वयासाठी समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय,
विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 ला माहिती.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हॉस्पिटलमध्ये दाखल
गुजरात : पंतप्रधान मोदी आज अहमदाबादला जाण्याची शक्यता,
प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिराबेन मोदी हॉस्पिटलमध्ये दाखल,
हिरा बेन मोदी यांच्यावर उपचार सुरू,
अहमदाबाद मधील मेहता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.
-
मुंबई महापालिकेच्या कूपर-भगवती रुग्णालयातील 200 कोटींचा घोटाळा प्रकरण
या घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा
या घोटाळा प्रकरणातील ठाकरे परिवारातील जवळची व्यक्ती आणि युवा सेनेचा बडा पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता
शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढल्यानंतर आता शिंदे गटाकडून पलटवार
-
-
नाशिककरांच्या आक्रमक भूमिकेनंतर स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना आली जाग
पंचवटीतील गोदावरी काठावरील ‘भोंगळ’ कामांची अधिकाऱ्यांनी केली पाहणी,
काही नागरिकांना सोबत घेऊन अधिकारी गोदावरी किनाऱ्यावर,
दुरावस्था झालेल्या पुरातन पायऱ्यांची होणार दुरुस्ती,
नाशिकचा धार्मिक आणि ऐतिहासिक ठेवा जपण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन,
काही दिवसांपूर्वी नाशिककरांनी केले होते स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात आंदोलन.
-
काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार येणार पुण्यातील काँग्रेस कार्यालयात
काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून शरद पवार यांना काँग्रेस कार्यालयात येण्याचे आमंत्रण देण्यात आलं होतं,
शरद पवारांनी हे आमंत्रण स्वीकारल्याचे कळत आहे,
त्याच अनुषंगाने आज संध्याकाळी शरद पवार हे काँग्रेस कार्यालयात भेट देण्यासाठी येणार आहेत,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर तब्बल 24 वर्षानंतर शरद पवार पहिल्यांदाच पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये येणार.
-
कोल्हापुरातील पर्यटन स्थळांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त
अंबाबाई, ज्योतिबा मंदिरासह सर्वच पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून खबरदारी
वाढलेल्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर वाढवला पोलीस बंदोबस्त
अंबाबाई मंदिरात श्वान पथकाची ही गस्त
पुढचा आठवडाभर पर्यटन स्थळांवर राहणार अतिरिक्त बंदोबस्त
-
नाशिकमध्ये वॉर्डबॉयकडून महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला
दवाखान्यातील कात्रीने शरीरावर केले सपासप वार, घटनेत डॉक्टर गंभीर जखमी,
गंगापूर रोडवरील निम्स रुग्णालयातील रविवारी रात्रीची घटना,
मैत्रिणीला महिला डॉक्टर ओरडत असल्याचा वॉर्ड बॉयच्या मनात होता राग,
गंगापूर पोलिसांकडून वॉर्डबॉय अनिकेत डोंगरेला अटक.
-
सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकाची गर्दी
कोल्हापूर शहरातील पार्किंगची ठिकाण झाली हाउसफुल,
शहर वाहतूक शाखेकडून नवीन सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था,
बिंदू चौक,दसरा चौका सह दोन शाळांच्या मैदानांवर केली पर्यटकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था,
पोलीस दलाकडून शहर वाहतूक शाखेला 40 कर्मचाऱ्यांची ज्यादा कुमक.
-
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे सरकारविरोधात आंदोलन..
अब्दुल सत्तारांविरोधात घोषणाबाजी
नागपूरची संत्री भष्ट्र आहेत मंत्री… अशी घोषणाबाजी
-
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
अब्दुल सत्तार यांच्या मागणीसाठी विरोधकांची विधान भवनाच्या पायरीवर घोषणाबाजी
अब्दुल सत्तार आज सभागृहात उत्तर देण्याची शक्यता
सत्तारांवर भूखंड घोटाळ्याचे आरोप करण्यात आलेत
उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तारांनी दिली आहे
-
भाजप खासदार सुजय विखेंचा महाविकास आघाडीवर निशाणा
विधान भवनात हाऊस न चालून देणे याचे एकमेव कारण मागच्या अडीच वर्षात हे कुठलेही काम करू शकले नाही,
यांचे अडीच वर्ष उघडे पडतील म्हणून यांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आंदोलन करताय,
तर हे आज कीर्तन करत आहे, अडीच वर्ष जनतेसाठी कोविडमध्ये रस्त्यावर उतरले नाही ,
मागच्या अडीच वर्षात आम्ही पाहिलं जे जेल मध्ये राहून मंत्री होते,
गुन्हेगारी वाढली आहे, मर्डर होत असून ते पोलिसांनी जे झाकलं आहे ते आम्ही उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही,
विरोधकांनी मागच्या तीन वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेचा जो छळ केला हा छळ आम्ही उघडे पाडतोय,
तर सत्ता गेल्यामुळे त्यांचा जीव घुटमळतोय म्हणून जास्त उद्रेक झालाय.
-
पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार आहे
रावेत जलउपसा केंद्राची उद्या सकाळपासून दुरुस्ती होणार
त्यामुळे उद्या दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे
शुक्रवारी म्हणजेच 30 तारखेला ही पाणी कमी दाबाने येणार
त्यामुळे नागरिकांनी पाण्याचे नियोजन करावे अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत
-
न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची काेकणाला पसंती
काेकणातले अनेक पर्यटन स्थळं पर्यटकांनी फुल्ल
न्यू ईयरसाठी पाच लाख पर्यटक येण्याची शक्यता
विशेष वाहनांचे परिवहन विभागाकडून आयाेजन
-
संजय राठोड यांचे आणखी एक जमीन वाटप वादात
वाशिम जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलत दिली 25 कोटी रुपयांची जमीन
संजय राठोड महसूलराज्यमंत्री असताना कारंजा लाड येथील 10 एकर गायरान जमीन दोन व्यक्तींना वाटप केल्याचे नवे प्रकरण आले समोर
7 ऑगस्ट 2019 ला आदेश देण्यात आल्याचे आले समोर
-
भाजप नेत्यासह नगरसेवकावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संशयित दोघेही भाजप पदाधिकारी,
खंडणी प्रकरणात संशयित आरोपीने आत्महत्या करत लिहिली सुसाईड नोट,
अनिरुद्ध धोंदू शिंदे असं आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव,
माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद,
मृत शिंदे यांच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात रात्री ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
-
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 7 जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर
श्रीमंत शाहू छत्रपतींच्या अमृत महोत्सवी वाढदिवस कार्यक्रमाला लावणार हजेरी
अमृत महोत्सवानिमित्त होत असलेल्या कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणीही देणार भेट
छत्रपती आणि पवार घराण्याचे जुने ऋणानुबंध
-
कोल्हापुरातील तब्बल 686 सहकारी संस्था अवसायनात निघणार
सहकार विभागाने दिले अंतरीम आदेश,
तर 14 संस्थांना बजावल्या अंतिम नोटीस,
अवसायनात निघणाऱ्या संस्थांमध्ये विकास सेवा संस्था आणि दूध संस्थांचा सर्वाधिक समावेश,
सहकार विभागाकडून कामकाज बंद असलेल्या संस्थांचं होते शुद्धीकरण,
जिल्ह्यातील 2200 संस्थांचं केलं सर्वेक्षण,
सर्वेक्षणा दरम्यान 134 संस्थान चा पत्ता देखील सापडेना.
-
भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे नगर महामार्गावर वाहतूकीत बदल
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 डिसेंबर सायंकाळी 5 वाजल्यापासून 1 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीत मोठे बदल
पुणे नगर महामार्गावरून सोडण्यात येणार फक्त अभिवादन सोहळ्यासाठी जाणारे वाहन
इतर वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध
पुण्याहून नगरकडे जाणारी वाहतूक हडपसर मार्गे वळवण्यात येणार
नगरकडे जाण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाचा वापर करावा, वाहतूक विभागाचे आवाहन
-
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना वनपरिक्षेत्रातील पर्यटन स्थळे तीन दिवसासाठी बंद
अतिउत्साही पर्यटकांकडून वन्यजीव व वनक्षेत्रात उपद्रव होऊ नये म्हणून निर्णय
30 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत ही पर्यटन स्थळे बंद असणार आहेत
बंदबाबतचं पत्रक वन्यजीव विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे
-
मुंबईतील कुर्ला येथे काल रात्री लागली भीषण आग
लाकडाच्या गोदामाला लागली आग, काही वेळातच अनेक गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी
अग्निशमन दलाच्या 8 वाहनांनी विझवली आग, ही आग रात्री उशिरा लागली होती
आगीत कोणीही जखमी नाही, आग कशी लागली याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक करणार आहे
-
रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ
रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचे पुन्हा नव्याने चौकशीचे आदेश
पुणे सत्र न्यायालयाने दिले आदेश
पुणे पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट सादर करताना न्यायालयात जमा केलेली कागदपत्रं पुन्हा तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे न्यायालयाचे आदेश
-
पालाच्या घरात बसून आमदार बच्चू कडू यांचं आपल्याच सरकारविरोधात आंदोलन
प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण व शहरी निकषात बदल करण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांचे अनोखे आंदोलन
बच्चू कडू यांचा रात्रीचा मुक्काम पालाच्या घरात…
कच्च्या मातीच्या पालघरात राहून करणार बच्चू कडू यांचे आंदोलन
पालातच राहून बच्चू कडू यांनी घेतले रात्रीचे जेवण
नागपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर शेकडो बेघर पाल ठोकून झाले दाखल
महामार्गा शेजारीं जंगलात वसवले बेघरांचे गाव
-
अजित पवार यांचे रात्री उशिरापर्यंत कामकाजात सहभाग
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल सकाळी कामकाज सुरू झाल्यापासून रात्री उशिरा 10.40 वाजता कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थित होते
विरोधी पक्षनेते म्हणून विरोधी पक्षांच्या ठरावावेळी कामकाज संपेपर्यंत उपस्थित राहून कामकाजात सहभाग घेतला
अजित पवार यांनी यावेळी अत्यंत महत्त्वाच्या सूचनाही मांडल्या
अजितदादांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदारही सभागृहात उशिरापर्यंत उपस्थित होते
Published On - Dec 28,2022 6:21 AM