Maharashtra Winter Session 2022 Live : आज अधिवेशनाचं सूप वाजणार, विधासभा अध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर होणार?
Maharashtra Winter Session 2022 Live : आज अधिवेशनाचं सूप वाजणार, विधासभा अध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर होणार?
नागपूर: आज अधिवेशनाचं सूप वाजणार आहे. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. तर हा ठराव आणताना आम्हाला विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अविश्वास ठरावावरून विरोधकांमध्येच फूट पडल्याचं चित्रं असल्याने या ठरावाचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
विधानसभेत गाजलेल्या सिल्लोड महोत्सवाची अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणी
औरंगाबाद : सिल्लोडच्या सूतगिरनी मैदानावर भरतोय सिल्लोड महोत्सव,
1 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सिल्लोड महोत्सवाचे उद्घाटन,
सिल्लोड महोत्सवाची आणि कृषी प्रदर्शन ची तयारी पूर्ण,
अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोड महोत्सवाच्या तयारीची पाहणी सुरू.
-
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचे बिगूलं वाजलं
चंद्रपूर : राज्य विधानसभेसाठी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक 30 जानेवारी रोजी होऊ घातली असून,
त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे,
या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात 7460 मतदार असून, दोन फेब्रुवारी रोजी याचा मतमोजणी होणार आहे,
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यंत्रणा कार्यान्वित केली असून,
सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
-
-
समृद्धी महामार्गावरील अपघात टाळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र थांबेनाच; वाशिममध्ये कारंजाजवळ झालेल्या कार अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक,
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना बोलावून स्पीड ब्रेकर, स्पीड मॉनिटरिंग सिस्टम आणि इतर बाबींची पूर्तता करण्याचे दिले आदेश,
प्रत्येक टोलनाक्यावर रुग्णवाहिका देणे आणि बचाव पथक तयार करण्याच्या हेतूने काम करण्याच्या सूचना.
-
मुंबईतील डबेवाले शरद पवार यांच्या भेटीसाठी
बारामती : विद्या प्रतिष्ठान सभागृहात ऑनलाईन डब्यांच्या सेवेचे सादरीकरण,
बारामतीतील विद्यार्थ्यांचाही उपक्रमात सहभाग,
शरद पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती.
-
वसईच्या चिंचोटी परिसरात एका कंपनीत भीषण आग
वसई : आज साडे आकाराच्या सुमारास ही आग लागली असून एक किलोमीटर पर्यंत आगीचे लोळ दिसत आहे,
वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळावर पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे,
या आगीत कोणतीही कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र कंपनी पूर्ण जळून खाक झाली आहे.
-
-
नव्या वर्षांत नाशिककरांसाठी आनंदाची बातमी
मार्चपासून सुरू होणार स्पाइस जेट आणि इंडिगोची विमानसेवा,
नाशिक विमानतळावरून देशातल्या ५ महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा,
दिल्ली आणि हैदराबाद पाठोपाठ बेळगाव, बेंगलोर, गोवा, नागपूर, अहमदाबाद शहरांसाठी विमानसेवा,
देशातल्या ७ मोठ्या शहरांशी नाशिकची एअर कनेक्टिव्हिटी वाढणार.
-
सरत्या वर्षाला निरोप देत असतांना आणि नववर्षाचे स्वागत होत असतांना पोलीस प्रशासन अलर्टमोडवर
वसई : जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय तील पोलीस यंत्रणा सज्ज
पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, तीन परिमंडळ मधील पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त सह 250 पोलीस अधिकारी, 1200 पोलीस अंमलदार, 250 होमगार्ड, 300 महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान असा फोजफाटा तैनात
31 डिसेंबर उपहारगृह व बार अँड restorant आज पहाटे 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास पोलीस प्रशासनाची परवानगी
मद्यपान करून बेदरकारपने वाहन चालवणा-या वाहांचालकावर कारवाही करण्यासाठी आयुक्तालयातील काश्मीरा, वसई, विरार या तिन्ही वाहतूक शाखेकडून ठिकठिकाणी होणार नाकाबंदी
-
अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव प्रस्तावाबाबत महविकास आघाडीत मतभेद?
अविश्वास ठराव प्रस्ताव आणण्यासाठी काँग्रेस आग्रही
काँग्रेसने दाखल केला अविश्वास ठराव प्रस्ताव
पण हा ठराव तांत्रिक पातळीवर टिकणे अवघड असल्यामुळेच अजित पवार यांनी सही केली नसल्याची माहिती
अविश्वास ठराव प्रस्ताव आणला तरी याबाबत तिन्ही पक्षात एकमत नसल्याचे चित्र
-
विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी येणाऱ्या नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन
कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी येणाऱ्या नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरावे, मात्र सक्ती नाही,
जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांचे आवाहन,
अभिवादन सोहळ्याला प्रत्येक जिल्ह्यांतून राज्यासह परराज्यातून 7 ते 8 लाख नागरिक येण्याचा अंदाज
-
औरंगाबाद- कुऱ्हाडीचे घाव घालून हुरडा विक्रेत्याचा निर्घृण खून
औरंगाबाद जिल्ह्यातील दहेगाव बंगला परिसरातील घटना
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावनेचा केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या
हत्या केल्यानंतर हातातील कुर्हाड नाचवत केला रस्त्यावरच जल्लोष
लग्नाच्या पाच वर्षानंतर एकटा गाठून केला खून
-
पुण्यातील कल्याणी नगर भागात घरात शिरून चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला
पुण्यातील कल्याणी नगर भागात घरात शिरून चोरट्यांचा लाखो रुपयांवर डल्ला
बंद बगल्या मध्ये शिरत चोरट्यांकडून 47 लाख 36 हजाराचा ऐवज लंपास केला
येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
खिडकीचे गज कापत घरात प्रवेश करत चोरांनी हात साफ केला
चोरट्यांकडून सोन्याचे दागिने हिऱ्याचे दागिने आणि रोकड असा एकूण 47 लाख 86 हजारांचा ऐवज लंपास
-
नाशिकमध्येदेखील रंगणार महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक स्पर्धा
नाशिकमध्येदेखील रंगणार महाराष्ट्र मिनी ऑलिंपिक स्पर्धा
2 ते 5 जानेवारीदरम्यान स्पर्धेतील काही क्रीडा प्रकार होणार नाशिकमध्ये
सिन्नर-शिर्डी समृद्धी महामार्गावर होणार सायकलिंग स्पर्धा
विभागीय क्रीडा संकुल येथे होणार योगा स्पर्धा
-
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्टवर
पुणे पोलिसांकडून शहरात कोम्बिंग ऑपरेशन
कारवाईत पुणे पोलिसांकडून 67 अट्टल गुन्हेगारांना अटक
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांचे शहरभर कोम्बिंग ऑपरेशन
अनेक गुन्हेगारांवर पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई
-
पुणे शहरातील रस्त्यांची होणार यांत्रिक सफाई
यांत्रिक सफाईसाठी पुणे महापालिका करणार साडेतीन कोटी रुपयांचा खर्च
प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या निधीला स्थायी समितीची मंजुरी
शहरातील मुख्य रस्त्यांची आता होणार यांत्रिक सफाई
बंडगार्डन रोड ,संगमवाडी ,रेल्वे स्टेशन, कोरेगाव पार्क या मुख्य रस्त्यांवर महापालिकेकडून यांत्रिक सफाई
-
कल्याण-डोंबिवली परिसरात थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर 16 महिला पोलिसांचे विशेष पथक तैनात
सार्वजनिक व खासगी ठिकाणी महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी महिला पोलीस गस्त घालत लक्ष ठेवणार
एका पोलीस ठाण्यात 2 अशा 8 पोलीस ठाण्यात एकूण 16 महिलांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हीराबाबेन मोदी यांना अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले.
त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला.
मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो.
आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.
स्वर्गीय हीराबाबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
-
अधिवेशनाचं आज सूप वाजणार
विरोधकांचा विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव
विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ठरावाची माहितीच नाही
ठरावा आधीच विरोधकात फूट?
Published On - Dec 30,2022 5:56 AM