केंद्राने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार: विजय वडेट्टीवार

केंद्र सरकारकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा आहे. हा डेटा मिळाला तर ओबीसींच्या आरक्षणाचा (obc reservation) मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे केंद्राकडून हा डेटा मिळवण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.

केंद्राने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा द्यावा; सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार: विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 11:35 AM

नागपूर: केंद्र सरकारकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा आहे. हा डेटा मिळाला तर ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे केंद्राकडून हा डेटा मिळवण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. (maharashtra government will fill repetition in supreme court for empirical data)

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. ओबीसी आरक्षणासाठी महत्त्वाचा असलेला इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचं संकट असल्याने डेटा गोळा करणं कठिण आहे. त्यामुळे केंद्राकडून डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत. कोर्टाने केंद्राला डेटा देण्याचे आदेश देण्याची विनंती करणार आहोत. तसेच कोरोना संकटात डेटा गोळा करता येईल का याबाबत कोर्टाचं मतही जाणून घेणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

डेटा मिळावा म्हणून केंद्राला दोन पत्रं

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळावा म्हणून आम्ही केंद्राला दोन पत्रं लिहिली आहेत. पण डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनीही इम्पिरिकल डेटा बाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे. हा डेटा मिळाला नाही तर सहकार क्षेत्रापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंतच्या अनेक निवडणुकांधील 40 ते 50 हजार जागांवर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत. त्यामुळेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लोणावळ्यात चिंतन बैठक

दरम्यान, ओबीसी आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका शिबीराचे आयोजन केले आहे. लोणावळ्यात येत्या 26 आणि 27 जून रोजी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय शिबिराचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत. या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शिबिराशी राजकारणाचा संबंध नाही

ओबीसींच्या प्रश्नावर पक्षापलिकडे जाऊन गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. हे शिबिर बोलावण्यामागे कोणतंही राजकारण नाही किंवा कोणतीही राजकीय भूमिका नाही. तसे असते तर मी सर्व पक्षीय नेत्यांना बोलावलं नसतं. मी कोणत्याही संघटनेत नाही. समाजाचा घटक आणि कार्यकर्ता म्हणून ओबीसी आरक्षणावर लढत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. (maharashtra government will fill repetition in supreme court for empirical data)

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ, पंकजा मुंडे, पटोले, संजय राठोड एकाच मंचावर येणार?; वडेट्टीवारांनी बोलावली ‘चिंतन’ बैठक!

संजय राऊत म्हणाले, शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी, अजितदादा म्हणतात….

इथे बावनकुळे म्हणाले शिवसेना संपवणार, तिथे गडकरींच्या उपस्थितीत सेनेच्या दोन नगरसेविका भाजपात

(maharashtra government will fill repetition in supreme court for empirical data)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.