AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mali Samaj | माळी समाजाचे राज्यात महासंपर्क अभियान, स्थानिक स्वराज्य संस्थांत समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे; अविनाश ठाकरेंचा पुनरुच्चार

माळी समाजाच्या प्रश्नांवर अभ्यासगट स्थापन करणार आहेत. समाजाच्या विकासासाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केले जाणार असल्याचं अविनाश ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले, माळी समाज हा ओबीसीमधला सर्वात मोठा घटक आहे. राजकीय आरक्षण स्थगित झाला आहे. माळी समाजाला फटका बसला आहे.

Mali Samaj | माळी समाजाचे राज्यात महासंपर्क अभियान, स्थानिक स्वराज्य संस्थांत समाजाला योग्य प्रतिनिधीत्व मिळावे; अविनाश ठाकरेंचा पुनरुच्चार
माळी समाजाचे राज्यात महासंपर्क अभियानImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:11 PM

नागपूर : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झालं. ओबीसींमधील मोठा घटक असलेल्या माळी समाजाने आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी महासंपर्क अभियानाला उपराजधानी नागपुरातून सुरुवात केलीय. समता संस्कृतिक भवनात (Samata Sanskritik Bhavan) माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे (National President Avinash Thackeray) यांच्या नेतृत्वात मेळावा घेण्यात आला. समाजातील प्रश्न आणि त्यावर सोडण्यासाठी चर्चा करण्यात आली. ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाजाला लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व मिळावे, हा मुख्य उद्देश या महासंपर्क अभियानाचे असणार आहे. यात पुढील 15 दिवस राज्यातील सर्वच जिल्ह्यात-जिल्ह्यात महासंपर्क अभियान (Mahasampark Abhiyan) राबवण्यात येणार आहे. पुढील 15 दिवस माळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाणार आहे. या माध्यमातून 1 लाख समाजातील कुटुंबातील लोकांशी संपर्क करून त्याचे प्रश्न जाणून घेतले जातील.

विकासाचे व्हिजन डाक्युमेंट तयार करणार

माळी समाजाच्या प्रश्नांवर अभ्यासगट स्थापन करणार आहेत. समाजाच्या विकासासाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केले जाणार असल्याचं अविनाश ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले, माळी समाज हा ओबीसीमधला सर्वात मोठा घटक आहे. राजकीय आरक्षण स्थगित झाला आहे. माळी समाजाला फटका बसला आहे. सरकारमधील सरंजामशाही गटाला आरक्षण नको. माळी समाजाचे राजकीय मागासलेपण आहे. शेतीचे प्रश्न आहेत. बेरोजगारीचे प्रश्न आहे. जनजागृती करणे आवश्यक आहे.

संघटना कोणत्याही पक्षाशी बांधील नाही

अविनाश ठाकरे म्हणाले, राजकीय संधी निघून जात आहे. याची माळी समाजबांधवांना जाणीव करून दिली जात आहे. यासाठी महाराष्ट्राचा दौरा आखतो आहे. माळी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय नेतृत्व मिळालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व मिळावं. पुण्याला वाचनालय व्हावं, या माध्यमातून उजळणी होईल. भाजपचा पदाधिकारी असलो, तरी माळी महासंघ ही संघटना आहे. ही संघटना कोणत्याही पक्षासी संबंधित नाही. समता परिषदेला कोण नेतृत्व करतात, याची तुम्हाला माहिती आहे. याचा अर्थ असा नाही की माळी महासंघ कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील राहील, असंही अविनाश ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

हे सुद्धा वाचा

मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट.
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.