Nagpur NCP | नागपुरात महाविकास आघाडीत बिघाडी!; मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळाचा नारा?
नागपुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली. नागपूर महापालिका निवडणूक तयारी म्हणून नुक्कड सभा सुरू असल्याचं ते म्हणालेत.
नागपूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीत (Mahavikas lead in elections) बिघाडी होत असल्याचं चित्र आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला. आता राष्ट्रवादीनेही नागपुरात स्वबळाच्या दिशेनं तयारी सुरु केलीय. शहरातील 52 प्रभागात 156 जागांवर राष्ट्रवादीने तयारी सुरु (The NCP started preparations)केलीय. यासाठी नुक्कड सभा सुरू केल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे (NCP’s city president Duneshwar Pethe) यांनी दिली. ॲाफर आल्यास शिवसेनेचा विचार करु, असंही ते म्हणाले. निवडणुकीसाठी सारे पक्ष सक्रिय झाले आहेत. भाजपने सर्व्हेवर भर दिला. अंतर्गत आणि बाह्य सर्व्हेचा रिपोर्ट आल्यानंतर उमेदवारी जाहीर केली जाईल. तोपर्यंत नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे. पुन्हा तिकीट मिळते की, नाही, या चिंतेने भाजपचे नगरसेवक ग्रासले आहेत. समजा तिकीट मिळाली नाही. तर अपक्ष राहायचे, दुसऱ्या पक्षाला उमेदवारी मागायचे की, शांतपणे पक्षाचेचं काम करायचे यावर त्यांचे चिंतन सुरू आहे.
राष्ट्रवादी नागपुरातून कशी संपणार?
महाआघाडीत कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातून राष्ट्रवादी संपविण्याचे बोलून दाखवितात. याचा राग राष्ट्रवादीला अद्याप आहे. त्यामुळं राष्ट्रवादी हे काँग्रेसच्या मागेमागे जाण्यास तयार नाही. राष्ट्रवादीचे प्रमुख शहरातील प्रमुख नेते अनिल देशमुख सध्या कैदेत आहेत. त्यामुळं आता राष्ट्रवादीची धुरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांभाळली. पटेल यांनी मध्यंतरी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवा, असं म्हटलं होतं. त्यामुळं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता स्वबळाची भाषा बोलत आहेत. आम्ही नुक्कड बैठकांवर भर देत असल्याचं दुनेश्वर पेठे यांनी सांगितलं. तिकडे काँग्रेसनेही एकला चलो रे सुरू केलंय. त्यामुळं राष्ट्रवादीलाही दुसरा पर्याय नाही. शिवसेनेचे चित्र मात्र वेगळे आहे. नव्यानं पक्षात आलेल्यांवर जुने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळं नागपुरात शिवसेनेचे कार्यकर्ते दुभंगले गेले असल्याच चित्र आहे. नेतृत्व कोण करणार यावरून वाद आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे नेतृत्त्व दुनेश्वर पेठे यांनी घेतले. ते स्वतः नगरसेवक आहेत. स्वतःची जागा वाचविणे आणि पक्षातील इतरांना मदत करणे, अशी दुहेरी भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे.