Nagpur Swarratna | महापौर स्वररत्न स्पर्धा; कोण ठरले विजेते जाणून घ्या?

वाराणसी येथे त्यांनी रामायणातील हम कथा सुनाते हैं.. हे गीत सादर केले होते. महापौर स्वररत्न स्पर्धेच्या अंतिम फेरी प्रसंगी सुद्धा वाडकर भगिनींनी हे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Nagpur Swarratna | महापौर स्वररत्न स्पर्धा; कोण ठरले विजेते जाणून घ्या?
महापौर स्वररत्न स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कार देताना महापौर दयाशंकर तिवारी.
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 9:45 PM

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर स्वररत्न गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये श्याम बापटे, अक्रम खान आणि ग्रंथिक खोब्रागडे हे अनुक्रमे 41 वर्षावरील, 18 ते 40 वर्ष आणि 7 ते 17 वर्ष या वयोगटातील विजेते ठरले. महापौर स्वररत्न स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. स्पर्धेतील विजेत्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

तीन वयोगटात घेण्यात आली स्पर्धा

पुरस्कार वितरण प्रसंगी क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, नगरसेवक नागेश सहारे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, देवेंद्र दोडके, लकी म्यूझिकल इंटरटेन्मेंटचे लकी खान उपस्थित होते. वयोगट 7 ते 17 वर्षे, 18 ते 40 वर्षे आणि 41 वर्षे व पुढील वयोगटासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. नागपूर शहरात विविध ठिकाणी झालेल्या ऑडिशननंतर उत्कृष्ट स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. यामध्ये 41 वर्षावरील वयोगटात श्याम बापटे यांनी प्रथम, गणेश चव्हायण यांनी द्वितीय आणि प्रसन्ना नायर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. 18 ते 40 वर्ष वयोगटामध्ये अक्रम खान यांनी प्रथम, सानिका बोभाटे यांनी द्वितीय आणि पूजा मिलमिले यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. 7 ते 17 वर्ष या गटात चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. अंतिम फेरीत चिमुकल्यांनी एकापेक्षा एक सरस गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या वयोगटात ग्रंथिक खोब्रागडे याने पहिला, आयुष मानकरने दुसरा आणि तनीष गजभियेने तिसरा क्रमांक पटकाविला. या वयोगटात कृष्णप्रिया घोटकर आणि स्वरा लाड यांना प्रोत्साहन पारितोषिक प्रदान करण्यात आले.

तिन्ही गटांतील पहिल्या तीन विजेत्यांना पुरस्कार

सर्व विजेत्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. अंतिम स्पर्धेमधील तीनही गटातील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यांना प्रत्येकी 21 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी 11 हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्यांना प्रत्येकी 7 हजार रुपये पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करीत स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. तत्पूर्वी स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उपमहापौर मनीषा धावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

वाडकर भगिनींचे हम कथा सुनाते…

उद्घाटनप्रसंगी मागील वेळी मनपातर्फे आयोजित व्हॉईस ऑफ विदर्भच्या विजेत्या भाग्यश्री आणि धनश्री वाडकर भगिनींची विशेष उपस्थिती होती. व्हॉईस ऑफ विदर्भनंतर वाडकर भगिनींनी इंडियन आयडलमध्ये भाग घेतला. वाराणसी येथे त्यांनी रामायणातील हम कथा सुनाते हैं.. हे गीत सादर केले होते. महापौर स्वररत्न स्पर्धेच्या अंतिम फेरी प्रसंगी सुद्धा वाडकर भगिनींनी हे गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

पोलिसांची पगार खाती Axis Bank मध्ये वळवली, फडणवीस-SBI ला कोर्टाची नव्याने नोटीस

काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज, दिल्लीत हायकमांडची भेट घेणार?

Nagpur | हिंगण्यात लपंडाव खेळत होती मुलं; छतावरील विद्युत तारांनी केला दहावीतील विद्यार्थ्याचा घात!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.