नागपुरातील रस्त्यांच्या सफाईसाठी मेकॅनिकल रोड स्विपिंग मशीन; रात्रीच्या वेळी होणार प्रमुख मार्गांची स्वच्छता

मशीनच्या मागील बाजूस हाय सक्शन पम्प बसविण्यात आले आहे. यामुळे कच-याचा मोठा ढिगारा, नारळ आदी सर्व शोषून ते मशीनमध्ये जमा होईल. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाईल, असेही डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले.

नागपुरातील रस्त्यांच्या सफाईसाठी मेकॅनिकल रोड स्विपिंग मशीन; रात्रीच्या वेळी होणार प्रमुख मार्गांची स्वच्छता
रोड स्विपिंग मशीनचे लोकार्पण करताना महापौर
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 5:00 AM

नागपूर : नागपूर शहरातील प्रमुख रस्त्यांसह, रिंग रोड, अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेमध्ये (Nagpur Municipal Corporation) मेकॅनिकल रोड स्विपींग मशीन उपलब्ध झालेली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत मनपाला दोन मशीन प्राप्त झालेल्या आहेत. या दोन्ही मशीनचे रात्री व्हेरॉयटी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी दोन्ही मशीनचे पूजन करून येथील चालकांचा सत्कार केला. मेकॅनिकल रोड स्विपींग मशीन (Mechanical road sweeping machine) हे नागपूर शहरातील रस्ते स्वच्छतेच्या दृष्टीने मोठे पाउल आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर, दुभाजकाच्या कडेला माती व कचरा जमा असतो त्यामुळे वाहतुकीस अडचण होते. या मशीनमुळे हे रस्ते पूर्णत: स्वच्छ होतील. मेकॅनिकल रोड स्विपींग मशीनद्वारे मुख्यत: रात्रीच स्वच्छता कार्य होणार असल्याने रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण न होता सहजरित्या स्वच्छता कार्य होईल. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाउल असून नागपूर शहरातील रस्ते स्वच्छता कार्यात यामुळे मोठा लाभ मिळणार आहे.

इंजिन क्षमता 5005 सीसी

प्रारंभी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी मेकॅनिकल रोड स्विपींग मशीनबद्दल सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या निधीमधून 45 लक्ष रुपये प्रति मशीन या दराने नागपूर महानगरपालिकेद्वारे दोन मेकॅनिकल रोड स्विपींग मशीन खरेदी करण्यात आलेल्या आहेत. मेकॅनिकल रोड स्विपर हे ट्रकवर बसविलेले मशीन आहे. याची इंजिन क्षमता 5005 सीसी असून हे मशीन दोन्ही बाजूचे ब्रश आणि मध्य भागातील ब्रशच्या सहाय्याने रस्ता स्वच्छतेचे कार्य करते. मध्य भागातील ब्रशची लांबी 1500 एमएम तर दोन्ही बाजूच्या ब्रशचे व्यास 600 एमएम एवढी आहे.

10 ते 12 किलोमीटर प्रतितास वेग

सदर मशीन रोड वरील धूळ झाडून ती मध्य भागातील ब्रश मधील व्हॅक्यूम पाईपच्या सहाय्याने कंटेनरमध्ये जमा होते. सदर कंटेनर ची धूळ साचविणायची क्षमता 6.5 क्युबिक मीटर आहे. सदर मशीन द्वारे एक तासात 10 ते 12 किलोमीटर प्रतितास वेगाने रस्ते झाडणे शक्य आहे. एका मशीनद्वारे साधारणत: साडेतीन मीटर रस्ता एकावेळी साफ होऊ शकतो. या मशीनद्वारे केवळ डिव्हायडर असलेले रस्तेच साफ करण्याचे नियोजन आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरील, बाजारातील, महत्वाचे इतर रस्ते आठवड्यातून किमान दोनदा स्वच्छ होतील, असे नियोजन करण्यात येणार आहे. रस्त्यासह रस्ता दुभाजक, फुटपाथ आदी सर्व या मशीनद्वारे स्वछ केले जाणार आहे.

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती

Tadoba Tiger | कोंडेगावात अवतरले वाघोबा; ग्रामस्थांनीच बदलला मार्ग, जंगलाबाहेर येण्याचे कारण काय?

मेळघाटातील बालमृत्यूची धक्कादायक आकडेवारी; सहा महिन्यांत पंधरा मातांच्याही मृत्यूची नोंद

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.