surgery | 19 वर्षे झाले तरी मासिक पाळी येत नव्हती! शस्त्रक्रियेतून डॉक्टरांनी तयार केला कृत्रीम योनीमार्ग
पाळीची जागा तयार झालेली नव्हती. तसेच गर्भाशय तयार झालेला नव्हता. याची माहिती वर्ध्या येथील तिच्या पालकांना देण्यात आली. कृत्रीम योनी तयार करता येईल, असे सांगितले.
नागपूर : वयाच्या 13, 14 व्या वर्षी मुलींना मासिक पाळी (Menstruation) येते. पण, वर्ध्यातील 19 वर्षीय मुलीला मासिक पाळी येत नव्हती. तिला योनीमार्गचं नसल्याचं स्पष्ट झालं. नागपूरच्या सुपर स्पेशॉलिटी (Super, Specialty) येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूनं तिला कृत्रीम योनीमार्ग तयार करून दिला. त्यामुळं त्या युवतीला खऱ्या अर्थानं स्त्रीत्व प्राप्त झालं.
काय असतो हा आजार
सुपर स्पेशालिटीतील डॉ. धनंजय सेलूकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेयर रोकीटान्स्की कुस्टर-हौसर सिंड्रोम दोन प्रकारचे आहेत. एकामध्ये योनी पाळी पाळीच्या जागा व गर्भाशय तयार झालेला नसतो. तर दुसऱ्या प्रकारात पाळीची जागा, गर्भाशय, मूत्रपिंड व स्पाईन तयार झालेले नसते. या युवतीला पहिल्या प्रकारचा सिंड्रोम होता. म्हणजे पाळीची जागा तयार झालेली नव्हती. तसेच गर्भाशय तयार झालेला नव्हता. याची माहिती वर्ध्या येथील तिच्या पालकांना देण्यात आली. कृत्रीम योनी तयार करता येईल, असे सांगितले. परंतु, तिला गर्भाशय प्रत्यारोपण करता येणार नाही. तसेच पाळी पुन्हा आणणे शक्य नसल्याचे सांगितले. पालकांकडून होकार मिळताच शस्त्रक्रिया करण्यात आली.
अशी तयार केली ट्यूब
शरीरातील जठराला जोडून मोठी व नंतर छोटी आतळी जोडलेली असते. छोट्या आतळीचा 10 ते 12 सेंटीमीटरचा भाग वेगळा करून त्याला ट्युब म्हणजे कृत्रीम योनी तयार करण्यासाठी काढण्यात आला. त्याचे व्यवस्थित प्रत्यारोपण केले. ही किचकट प्रक्रिया असली, तरी डॉक्टरांच्या चमूनं यशस्वी शस्त्रक्रिया केली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात डॉ. धनंजय सेलुकर यांच्या मार्गदर्शनात डॉ. नीलेश नागदेवे, डॉ. अजित पटेल व डॉ. महेश बोरीकर यांनी ही शस्त्रक्रिया केली.
शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया
मेयर रोकीटान्स्की कुस्टर-हौसर सिंड्रोम ही अतिदुर्मीळ विकृती असल्याची माहिती डॉ. सुपर स्पेशॉलिटीतील युरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. धनंजदय सेलुकर यांनी दिली. शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. स्त्रीत्व ही महिलेला निसर्गानं दिलेली देणगी. पण, साडेचार हजार मुलींपैकी एका मुलीमध्ये जन्मताच स्त्रीत्व नसते. अशा दुर्मीळ आजारानं ही युवती ग्रस्त होती. पण, तिला याची जाणीवच झाली नव्हती.