‘शिवाजी महाराजांचे नाव वापरतात, मग शिवसेनेचा अध्यक्ष महाराजांचा वंशज हवा होता’ उद्धव ठाकरेंना कुणी सुनावले

उद्धव ठाकरे असा गैरसमज का करून घेता की तुमच्या नावानेच लोक निवडून येतात. मग फक्त 56 मतदारसंघात तुमचे नाव चालते का? इतर ठिकाणी तुमचं नाव चालत नाही का?

'शिवाजी महाराजांचे नाव वापरतात, मग शिवसेनेचा अध्यक्ष महाराजांचा वंशज हवा होता' उद्धव ठाकरेंना कुणी सुनावले
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 12:10 PM

नागपूर : शिवसेनेत बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) वारंवार बाप चोरल्याचा आरोप करत आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जात असल्याने उद्धव ठाकरे बाप चोरल्याचा आरोप करताय. तसेच पक्ष अन् धनुष्यबाणही चोरल्याचे सांगत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बाप चोरल्याचा आरोपावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पक्ष म्हणजे काय वडिलोपार्जित संपती नाही, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव वापरतात, मग शिवसेनेचा अध्यक्ष महाराजांचा वंशज हवा होता, असा पलटवार मुनगंटीवार यांनी केला.

बहुमत शिंदे गटाकडे

हे सुद्धा वाचा

शिवसेनेतील बहुमत शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना त्यांना दिली. पक्ष काही वडिलोपार्जित संपत्ती नाही. आमच्या पित्याने पक्ष काढला म्हणजे आमचा अधिकार आहे, असे होत नाही. जर तसे मान्य केले तर मग उर्वरित दोन भावांचा अधिकार नाही का? इतर ठाकरे कुटुंबीय शिंदे गटात आहेत. बाळासाहेबांचा वारसा चालवणारे दोन तृतीयांश ठाकरे शिंदे गटात आहेत. तुम्ही पक्षाचे नाव शिवसेना ठेवले. शिवाजी महाराजांचे नाव वापरतात. मग छत्रपतींचे वंशज शिवसेनेचे अध्यक्ष राहिले पाहिजे होते ना? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उद्धव ठाकरे असा गैरसमज का करून घेता की तुमच्या नावानेच लोक निवडून येतात. मग फक्त 56 मतदारसंघात तुमचे नाव चालते का? इतर ठिकाणी तुमचं नाव चालत नाही का?. तुम्ही पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला होता, तो शिंदे यांनी सोडवला.

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

राज्याच्या मंत्रिमंडळाचे विस्तार कधी होणार? या प्रश्नावर योग्य क्षणी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. अडीच वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो. आम्ही कोणीही मंत्री नव्हतो. तेव्हाही राज्याचे प्रश्न घेऊन आम्ही लढत होतो. लोकांचे प्रश्न सोडवत होतो. आता मंत्रिमंडळाचा विस्तार काही कारणामुळे थांबला होता. पण योग्य वेळी विस्तार होईल. मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात माहिती दिलीच आहे, असे त्यांनी सांगितले.

राऊत यांची धमकी

संजय राऊत यांच्या धमकीचा प्रकरण गंभीर आहे की नाही, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. या प्रकरणांमध्ये सत्यता आहे की नाही याचा तपास झाला पाहिजे. अन्यथा एक नवीन फॅशन सुरू होईल. आरोप करायचा आणि मात्र आरोपासंदर्भात माहितीचा स्त्रोत सांगायचाच नाही. संजय राऊत यांच्यांकडे जी माहिती असेल ती पोलिसांनी त्यांच्यांकडून घेतली पाहिजे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.