पण मला टॅक्सीत आणू नका… हात जोडून राज ठाकरे असं का म्हणाले?

बाळासाहेब टॅक्सीत बसले. माझ्या डोळ्यासमोर मी जे चित्रं पाहिलं ते वेगळचं होतं. पुढे टॅक्सी जात होती. आम्ही टॅक्सीत होतो. टॅक्सी चालली आहे. टॅक्सीच्या मागून लाल दिव्याची गाडी येत होती...

पण मला टॅक्सीत आणू नका... हात जोडून राज ठाकरे असं का म्हणाले?
पण मला टॅक्सीत आणू नका... हात जोडून राज ठाकरे असं का म्हणाले? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 1:40 PM

नागपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली. ही नियुक्तीपत्रे देतानाच कार्यकर्त्यांमध्ये प्राणही फुंकले. तुम्हाला उभं राहायचं असेल तर जीवाचं रान करून काम करा. येईल त्या संकटाला सामोरे जा. घाबरू नका. विरोधक तुम्हाला हसतील. तुमचा अपमान करतील. अपमान सहन करा. मन घट्ट करा. फक्त जमिनीवर पाय रोवून उभं राहा. यश नक्कीच आपलं आहे, असं सांगत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकले.

राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी छोटेखानी सभा झाली. या सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा ऐकवून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. सुधीर जोशी महापौर असतानाची हा किस्सा आहे.

हे सुद्धा वाचा

एके दिवशी बाळासाहेबांना बाहेर जायचं होतं. पण त्या दिवशी ड्रायव्हर आला नाही. त्यामुळे टॅक्सी मागवण्यात आली. तेवढ्यात तत्कालीन महापौर सुधीर जोशी आपल्या लाल दिव्याच्या गाडीसह मातोश्रीवर आले. त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली.

त्यानंतर बाळासाहेबांनी शिवसेना भवनात जाण्यासाठी टॅक्सी मागवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा तुम्हा माझ्यासोबत चला. लालदिव्याच्या गाडीतून मी तुम्हाला शिवसेना भवनात सोडतो असं ते म्हणाले. तेव्हा तुम्ही तुमच्या गाडीत बसा. मी टॅक्सीने जातो असं बाळासाहेब म्हणाले.

त्यानंतर बाळासाहेब टॅक्सीत बसले. माझ्या डोळ्यासमोर मी जे चित्रं पाहिलं ते वेगळचं होतं. पुढे टॅक्सी जात होती. आम्ही टॅक्सीत होतो. टॅक्सी चालली आहे. टॅक्सीच्या मागून लाल दिव्याची गाडी येत होती… पॉवर कशाला म्हणतात ना… ताकद कशाला म्हणतात ना… ताकद त्या टॅक्सीत बसली होती. लाल दिवा मागून येत होता.

हे चित्र ज्या मुलाने लहानपणी पाहिलं असेल त्याला या गोष्टींचं कौतुक काही असेल का हो? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर पण मला टॅक्सीत आणू नका एवढी विनंती आहे तुम्हाला, असं राज यांनी हात जोडून म्हणताच एकच खसखस पिकली.

पॉवरही अशी असते. आमदार, नगरसेवक, खासदार या सर्व पदावर तुम्हालाच बसायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला जीवाचं रान करावं लागेल. प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. अपमना सहन करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

अनेक इतिहास अपमानातून घडलेले आहेत. महात्मा गांधींना ट्रेनमधून ढकललं नसतं तर महात्मा गांधी भारतात आलेच नसते. कुठली चळवळ आणि कसलं काय? काहीच घडलं नसतं. हे काम करताना लोकं टोमणे मारतील. अपमान करतील. प्रेमही करतील. पण जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहा. यश नक्कीच आपलं आहे. तुम्ही कोणत्याही पदावर असा पण कुणाल तुच्छ मानू नका, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.