विदर्भात सूर्य अक्षरश: आग ओकतोय, महाराष्ट्रात पाऊस कधी येणार? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट

Maharashtra Rain Update | महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची खूप वाट पाहत आहेत. अनेकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. तर काही शेतकरी पहिल्या पावसाची वाट पाहत आहेत. अनेकांचं पाण्यावर सर्व काही अवलंबून असतं. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. असं असताना पाऊस राज्यात अद्याप दाखल झालेला नाही. मान्सून राज्यात नेमका कधी येईल? या विषयी हवामान विभागाने माहिती दिली आहे.

विदर्भात सूर्य अक्षरश: आग ओकतोय, महाराष्ट्रात पाऊस कधी येणार? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 5:16 PM

नागपूर : महाराष्ट्रातील शेतकरी सध्या चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात वाढ होत आहे. परिणामी पावसाचा हंगाम पुढे ढकलला जातोय. वेळ पुढे निघून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील धाकधूक वाढली आहे. पाऊस पडलाच नाही तर कसं होईल? अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये येऊ लागला आहे. पावसावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. फक्त शेतकरीच नाही तर प्रत्येक व्यक्ती हा पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाने येणं जास्त महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे 22 जून तारीख येऊन गेली तरी राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याचं ऊन पडत आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट सांगण्यात आलीय. त्यामुळे पाऊस कधी येईल? हाच प्रश्न प्रत्येकाला सतावतोय.

विदर्भात सध्या सूर्य आग ओकतोय. त्यामुळे विदर्भात नेमका पाऊस कधी पडेल? असा प्रश्न आहे. याच विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मान्सून विदर्भासह महाराष्ट्रात कधी दाखल होईल, या विषयी अत्यंत बारकाईने माहिती दिली. तसेच पावसाला उशिर होण्यास नेमकं कारण काय? हे देखील त्यांनी अतिशय सोप्या भाषेत समजवून सांगितलं.

मान्सून नेमका कधी येईल?

“पावसासाठी आता हळूहळू अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. विदर्भात सध्या प्रचंड गरमी आहे. विदर्भात आजही उष्णतेची लाट आहे. पण उद्यापासून परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. उद्यापासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात व्हायला आहे. त्यानंतर पुढच्या तीन ते चार दिवसांत अनुकूल वातावरण राहिलं तर मान्सून विदर्भात प्रवेश करेल”, असं नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहनलाल शाहू यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

गेल्या 13 वर्षाचा रेकॉर्ड तुटला

“आमच्याकडे गेल्या 20 वर्षांपासूनचा रेकॉर्ड आहे. त्यानुसार 2009 मध्ये 26 जूनला मान्सून दाखल झाला होता. हा सर्वात उशिरा आलेला मान्सूनचा रेकॉर्ड आहे. त्याआधी 24 जूनला देखील विदर्भात मान्सून दाखल झाल्याचा रेकॉर्ड आहे. पण यावर्षी 22 जून उजाडला तरी मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे गेल्या 13 वर्षांचा रेकॉर्ड तुटलेला आहे”, असं मोहनलाल शाहू यांनी सांगितलं.

“सर्वसामान्यपणे 10 जून ते 15 जून दरम्यान मान्सून हा विदर्भात दाखल होतो. पण यावर्षी अशी परिस्थिती आहे की, कालपर्यंत कर्नाटकाच्या काही भागात पाऊस पडला, पण तरीही तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड या भागात अद्याप पाऊस पडलेला नाही. दुसरीकडे आज काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तसं बघायला गेलं तर मान्सून विदर्भापासून अजूनही लांबच आहे”, असं शाहू म्हणाले.

मान्सूनला इतका उशिर का?

“मान्सून उशिरा येण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय वादळ. या वादळाने भारतीय महासागराची भरपूर ऊर्जा घेतली आहे. त्यानंतर गेल्या सात ते आठ दिवसांमध्ये महासागरात कोणत्याही प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र हवं तसं निर्माण झालेलं नाही”, असं शाहू यांनी सांगितलं.

पाऊस कधी येणार?

“आता बंगालच्या उपसागरात तशा घडामोडी घडू लागल्या आहेत. येत्या 24 जूनला बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात वेगाने घडामोडी घडू शकतात आणि भारतात पाऊस पडेल, अशी शक्यता आहे”, असा अंदाज मोहनलाल शाहू यांनी वर्तवला.

“मान्सूनला विदर्भात यायला अजून दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतरच पाऊस पडेल. त्यामुळे जवळपास दहा दिवस हा मान्सून उशिराने येत आहे, असं मानलं जात आहे”, असंदेखील शाहू यांनी सांगितलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.