Nagpur | अर्धवट जळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं! आत्महत्या केल्याचं उघड, का दिला जीव?

नागपुरात अर्धवट जळलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला होता. त्या तरुणीनं आत्महत्या केल्याचं उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तरुणी तणावात असल्याची माहिती आहे. त्यातून तीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Nagpur | अर्धवट जळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं! आत्महत्या केल्याचं उघड, का दिला जीव?
नागपूर येथे तरुणीचा जळालेला मृतदेह सापडला.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 5:21 PM

नागपूर : सुराबर्डी परिसरात 23 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह काल रात्री सापडला. वाडी पोलीस (Wadi Police) ठाण्याच्या हद्दीतील निर्जनस्थळी हा मृतदेह आढळला होता. तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता. प्रथमदर्शनी तिची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात तरुणीची हत्या झाली नाही. तिने स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा (Shocking Revealed) झालेला आहे. या संदर्भात शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी माहिती दिली आहे.

मंगळवारी झाली होती बेपत्ता

तरुणी गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांना आहे. ती मंगळवारी बेपत्ता झाली होती. त्यानंतरचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरून तरुणीची हत्या झाली नाही. तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच यासंदर्भात अंतिम निष्कर्षापर्यंत जाता येईल, असे देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

मित्राकडून मागितले डिझेल

खासगी कारणाने मानसिक तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात इतर कुणाचा सहभाग दिसून येत नाही. तरी तिने खोटं कारण सांगून मित्राकडून डिझेल मागवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.

Video – फडणवीस, गडकरी यांनी एकमेकांना भरविला विजयाचा पेढा, नागपुरात दोघांचाही जल्लोषात सत्कार

Devendra Fadnavis | गोवा तो झाकी हैं, महाराष्ट्र अभी बाकी हैं; देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात निर्धार

Gadchiroli Naxal | गडचिरोलीत 2 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 20 लाख रुपयांचे होते बक्षीस

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.