दोन वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, खेळता-खेळता गेला तलावात, नगरधन येथील ह्रदयद्रावक घटना

दोन वर्षीय शौर्य दिसत नसल्याने गावात त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण, कुठेही त्याचा पत्ता आढळला नाही. शौर्य हरविल्याची चर्चा नगरधन गावात पसरली. पोलिस ठाण्यामध्ये हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर काही नागरिकांना तलावात मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.

दोन वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू, खेळता-खेळता गेला तलावात, नगरधन येथील ह्रदयद्रावक घटना
Drowning
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 12:41 PM

नागपूर : रामटेकजवळील नगरधनच्या तलावात दोन वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दोन वर्षीय शौर्य सागर माहुले असे मृत बालकाचे नाव आहे. खेळता-खेळता तो तलावात गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पालकांना आता आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नगरधन इंदिरानगर येथील सागर माहुले यांचा मुलगा शौर्य रविवारला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास खेळता खेळता निघून गेला. दोन वर्षीय शौर्य दिसत नसल्याने गावात त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण, कुठेही त्याचा पत्ता आढळला नाही. शौर्य हरविल्याची चर्चा गावात पसरली. पोलिस ठाण्यामध्ये हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर काही नागरिकांना तलावात मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. शौर्य सागर माहुले हाच असल्याने पोलिसांनी आकस्मित मृत्यू नोंद केली. तपास पीएसआय सीमा बेंद्रे करीत आहेत.

यशोधरानगरात दीड लाखांची चोरी

नागपूर शहरातील यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीत घरफोडीची घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली. याची एकूण किंमत १ लाख ५४ हजार रुपये आहे. १२ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजता ते १३ नोव्हेबरच्या सकाळी ११.४५ वाजताच्या दरम्यान, यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीतील संजय गांधीनगर, बिनाकी ले-आउट येथे राहणारे पंकज मारोती गजभिये (वय ३६) हे घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. या दरम्यान, कुणीतरी अज्ञात चोराने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी आलमारी व बॅगमधून सोन्याचांदीचे दागिने व नगदी १५ हजार रुपये असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

इमामवाड्यात तरुणाने घेतला गळफास

इमामवाडा पोलिस ठाणे हद्दीतील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. जाटतरोडी येथील इंदिरानगरचा भूषण देवराव वासनिक (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे. भूषणने लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

इतर बातम्या

नागपूर मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कार्यकर्त्यांना आवाहन

नागपूर शहरात जमावबंदी लागू, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही

'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.