भिकाऱ्यांची टुरटुर ; डबल डेकर एसी बसमधून करणार यात्रा, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे पाऊल

Nagpur Beggars Tour : भिकारी म्हटलं की आपला पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. केविलवाणा, मळकटलेला, गलिच्छ आणि अस्वच्छ राहणारा अशी त्यांची प्रतिमा समाजाच्या मनात आहे. पण त्याला नागपूरमध्ये छेद देण्यात आला आहे. या शहरातील ज्येष्ठ भिकाऱ्यांची टुरटुर आयोजित करण्यात आली आहे.

भिकाऱ्यांची टुरटुर ; डबल डेकर एसी बसमधून करणार यात्रा, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे पाऊल
भिकाऱ्यांची टुरटुरImage Credit source: संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 11:52 AM

देशात भिकाऱ्यांची समस्या मोठी आहे. अनेक शहरातील मुख्य चौक आणि सिग्नलवर भिकारी हमखास दिसतो. सकाळच्या सत्रात तर काही रेल्वे आणि बसेसने भिकारी मोठ्या शहरात येतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर गुरुवारी सकाळीच भिकारी रेल्वे आणि बसने दाखल होतात. दिवसभर भीक मागितल्यानंतर ते परत जातात, असा अनेक शहरात त्यांचा शिरस्ता आहे. भिकाऱ्यांकडे पाहण्याचा समाजाचा एक दृष्टिकोन आहे. अनेक जण एक दोन रुपये देऊन तर काही जण 10 रुपये देऊन स्वतःची सुटका करुन घेतात. पण नागपूर हे शहर त्याला अपवाद ठरले आहे. या शहरातील ज्येष्ठ भिकाऱ्यांना सहलीवर नेण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.

नागपुरातील ज्येष्ठ भिकारी निघाले सहलीला

नागपुरातील ज्येष्ठ भिकारी सहलीला निघाले आहेत. हे भिकारी रामटेकच्या रामधामची यात्रा करणार आहेत. भिकारी मुक्त भारत अभियान अंतर्गत या सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 50 जेष्ठ भिकारी डबल डेकर एसी बसमधून सहलीला निघाले आहेत. भिकाऱ्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणावे. त्यांच्या जीवनात सुद्धा आनंदाचे क्षण यावे. त्यांना सुद्धा माणूस म्हणून जगता यावं यासाठीचा हा प्रयत्न आहे.

हे सुद्धा वाचा

भारताचा झेंडा घेऊन सहलीला

भिकारी मुक्त भारत अभियान चा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सहलीला जाणाऱ्या भिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पहिल्यांदा सुविधा जनक बसमध्ये बसून सहलीला जाण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसला. भारताचा झेंडा हातात घेऊन हे भिकारी सहलीला निघाले.

यापूर्वी झाली होती टीका

यापूर्वी जी-20 वेळी हे भिकारी अचानक गायब झाले होते. या संमेलनावेळी इतर देशांच्या पाहुण्यांना भिकारी दिसू नये याची काळजी प्रशासनाने घेतली होती. त्यावेळी नागपूरमधील भिकारी गेले तरी कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला होता. भिकारी अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. संमेलनासाठी हे भिकारी गायब झाल्याचे कळल्यावर अनेक जणांनी त्यावर टीका सुद्धा केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.