AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच इथं सापडायचे नाग? मग नागपूर नावामागील इतिहास काय? जाणून घ्या खरी कहाणी

Nagpur Name Interesting Story : नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. हिवाळी अधिवेशन येथे भरते. हे देशातील मध्यवर्ती शहर म्हणून पण ओळखले जाते. पण या शहराला हे नाव कशामुळे पडले? खरंच सापांमुळे हे नाव पडलं का? काय आहे त्याचा इतिहास? जाणून घ्या...

खरंच इथं सापडायचे नाग? मग नागपूर नावामागील इतिहास काय? जाणून घ्या खरी कहाणी
नागपूर नावाचा इतिहासImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Apr 25, 2025 | 4:13 PM

महाराष्ट्रातील अनेक शहरं ही देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसतात. ती लोकप्रिय आहेत. नागपूर पण असेच एक लोकप्रिय शहर आहे. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. हिवाळी अधिवेशन येथे भरते. हे देशातील मध्यवर्ती शहर म्हणून पण ओळखले जाते. हे शहर ऑरेंज सिटी म्हणून पण ओळखल्या जाते.- पण या शहराला नागपूर हे नाव कशामुळे पडले? खरंच सापांमुळे हे नाव पडलं का? काय आहे त्याचा इतिहास? जाणून घ्या…

18 व्या शतकात स्थापना

या शहराची स्थापना 18 व्या शतकात करण्यात आली होती. नागपूर हे एकदम हटके नाव आहे. या नावावरून अनेकांना वाटते अथवा काही जण गंमतीने इथं फार नाग, साप सापडायचे म्हणून या शहराचे नाव नागपूर असे पडले असे सांगतात. पण या नावामागे एक इतिहास आहे. तो अनेकांना माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का, या शहराला नागपूर हे नाव का पडले ते?

हे सुद्धा वाचा

नागपूरची संत्री संपूर्ण जगात लोकप्रिय आहेत. येथील रसरशीत आणि गोड संत्र्‍यांना परदेशात सुद्धा मोठी मागणी आहे. अनेक टन संत्री देशातच नाही तर परदेशात सुद्धा पाठवण्यात येतात. या शहराचा इतिहास जवळपास 3 हजार वर्षे जुना आहे. मग संत्र्यांसाठी लोकप्रिय असलेल्या या शहराला नागपूर हे नाव, ही ओळख कशी मिळाली?

यामुळे पडले नागपूर नाव

या शहराचे नाव नागपूर असल्याबाबत अनेक मत प्रवाह आहेत. येथे नागवंशीय लोकांची वस्ती असल्याने या गावाला नागपूर हे नाव पडले असे एक मत आहे. तर काही जण दुसरे मत मांडतात. नाग नदीच्या नावावरून या शहराला नागपूर असे नाव पडल्याचा दावा करण्यात येतो. नाग नदी नागपूरमधून वाहते.

नागपूरचे जुने नाव माहिती आहे का?

नागपूर हे नाव मिळणाऱ्या पूर्वी या गावाला दुसर्‍याच नावाने ओळखले जायचे. नागपूरचे जुने नाव फनिपूर अथवा फणिद्रपुरा असे होते. हे एक मराठी नाव आहे, त्याचा अर्थ फणादारी नाग अथवा साप. काही दाव्यानुसार, नागपूर शहर जिथे आहे, तिथे पूर्वी नागफणीचे जंगल होते. त्यावेळी तिथे नाग सुद्धा मोठ्या संख्येने होते. पण काही लोक हा संदर्भ नागवंशीय लोकांसाठी असल्याचा दावा करतात. आज नागपूर हे शिक्षण, व्यापार, राजकारणापासून इतर प्रांतात प्रगतीवर आहे.

टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.