Nagpur Corona Update | वर्षभरानंतर नागपुरात सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद, शहरात 18, ग्रामीणमध्ये 10 नवे रुग्ण

तब्बल वर्षभरानंतर नागपुरात सर्वात कमी रुग्णसंख्येची (Nagpur Corona Cases Update) नोंद झाल्याने नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. नागपूर शहरात गेल्या 24 तासांत 18, तर ग्रामीणमध्ये 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Nagpur Corona Update | वर्षभरानंतर नागपुरात सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद, शहरात 18, ग्रामीणमध्ये 10 नवे रुग्ण
Nagpur Corona Update
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 12:37 PM

नागपूर : तब्बल वर्षभरानंतर नागपुरात सर्वात कमी रुग्णसंख्येची (Nagpur Corona Cases Update) नोंद झाल्याने नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. नागपूर शहरात गेल्या 24 तासांत 18, तर ग्रामीणमध्ये 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृत्युसंख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. काल दिवसभरात शहरात 1 तर ग्रामीणमध्ये शून्य मृत्युंची नोंद जाली आहे (Nagpur Corona Cases Update Lowest Number Of Patients In A Year In Last 24 Hours).

नागपूर जिल्ह्यात पॉझिटिव्हीचा दरही 0.43 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. सध्या जिल्ह्यात 1770 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दर 97.74 वर पोहोचला आहे.

राज्यातील रुग्णसंख्येतही घट

दुसरीकडे, राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 529 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासांत 725 रुग्ण बरे झाले आहेत, तर आजपर्यंत राज्यात 684107 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर 672 दिवसांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 59 लाख 09 हजार 078 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 10 हजारांनी घट झाली आहेच, मात्र गेल्या 75 दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. कालच्या दिवसात 60 हजार 471 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 2 हजार 726 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 60 हजार 471 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 726 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 1 लाख 17 हजार 525 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 95 लाख 70 हजार 881 वर गेला आहे. देशात 2 कोटी 82 लाख 80 हजार 472 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 77 हजार 31 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 9 लाख 13 हजार 378 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 25 कोटी 90 लाख 44 हजार 72 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Nagpur Corona Cases Update Lowest Number Of Patients In A Year In Last 24 Hours

संबंधित बातम्या :

Maharashtra 5 level Unlock: अनलॉकच्या 5 लेव्हलमध्ये तुमच्या जिल्हा आणि महानगरपालिकेची स्थिती काय? रेड झोनमध्ये कोणते जिल्हे?

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लसीकरणाची नोंद?

2 डोसमधील अंतर वाढवल्यास संसर्गाचा धोका अधिक, अमेरिकेच्या वैद्यकीय सल्लागारांचा दावा

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.