कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, मॉल्स बंद, दुकानं 4 वाजेपर्यंत सुरु, सोमवारपासून नागपुरात नवे निर्बंध

महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, मॉल्स बंद, दुकानं 4 वाजेपर्यंत सुरु, सोमवारपासून नागपुरात नवे निर्बंध
महाराष्ट्र लॉकडाऊन
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 5:59 PM

नागपूर : महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. त्यामुळे सोमवारपासून नागपुरात नवीन निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून नागरपुरात सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार, मॉल्स मात्र बंद राहणार आहेत. (Nagpur District collector Ravindra Thackeray declare new restriction amid corona pandemic third wave)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट चे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आलेले आहेत. त्यानुसारच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.

नवे निर्बंध

  • सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
  • मॉल्स बंद
  • हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार
  • लग्नकार्य 50% क्षमतेने किंवा पन्नास लोकांमध्येच करता येणार
  • जिम, सलून, स्पा दुपारी चार वाजेपर्यंत खुले राहणार
  • अंतयात्रेला केवळ 20 लोकांना परवानगी असणार
  • स्विमिंग पूल बंद असणार

नागपुरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी आढळून आलेल्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण यामुळेच जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आज दिवसभरात नागपूर शहरात 11 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 46 जण बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरात सध्या 544 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

इतर बातम्या

मोठी बातमी ! पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, नवी नियमावली जारी

नागपुरात कोरोना लसीकरणाला तुफान प्रतिसाद, एकाच दिवसात तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण

नागपूरच्या ‘त्या’ हत्याकांडातले महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती, हत्यारा आणि मेहुणीच्या कनेक्शननं पोलीस चक्रावले, आता डीएनए टेस्ट होणार

(Nagpur District collector Ravindra Thackeray declare new restriction amid corona pandemic third wave)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.