‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान…’, पराभवानंतर काँग्रेस उमेदवाराने जे केलं त्याने मनं जिंकली

नागपूर मध्य मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेसचे बंटी शेळके यांचा पराभव झाला, तरी त्यांनी भाजपच्या विजयी उमेदवार प्रवीण दटके यांचे अभिनंदन करून एक आदर्श निर्माण केला. त्यांची ही नम्रता आणि खेळाडू वृत्ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हे राजकारणातील सौजन्याचे एक उत्तम उदाहरण आहे. निवडणुकीतील विजय-पराजय हा भाग असला तरी, अशा कृतींची गरज आहे.

'नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान...', पराभवानंतर काँग्रेस उमेदवाराने जे केलं त्याने मनं जिंकली
पराभवानंतर काँग्रेस उमेदवाराने जे केलं त्याने मनं जिंकली
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 9:14 PM

‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हुँ’ हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे बोल आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा खरा प्रत्यय त्यांच्या शिलेदाराने आज नागपुरात दाखवून दिला. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. पण त्याकडे त्याच नजरेनं पाहणं जास्त आवश्यक असतं. आजच्या काळात राडेबाजीचं राजकारण थैमान माजवत असताना कुणीतरी अशी कृती करुन दाखवणं ही काळाची खूप गरज आहे. निवडणुका होत राहतात. त्यामध्ये विजय-पराजय हा त्याचा एक भाग आहे. पण त्यामुळे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे असणारे उमेदवार हे परस्परांचे वैयक्तिक शत्रू बनत नाहीत. त्यामुळे निवडणुकीकडे तितक्याच डोळस वृत्तीने बघितलं पाहिजे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तिथे घडला जिथे चार दिवसांपूर्वीच प्रचाराला गेलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या रॅलीत घुसून भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराने पराभवानंतर केलेल्या या कृतीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

संघ मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर मतदारसंघ संपूर्ण निवडणूक काळात चर्चेत राहिला. नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी भाजपचे प्रवीण दटके निवडून येताच पुष्पगुच्छ देऊन गळाभेट घेऊन पेढा भरवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. निवडणुकीत हार जीत हे सुरूच राहणार. पण पराभूत होऊन सुद्धा जिंकणाऱ्याला शुभेच्छा देत बंटी शेळकेंनी पुन्हा वेगळंपण दाखवलं. एकंदर पूर्ण निवडणुकीच्या काळात मध्य नागपुरावर सर्वांचे लक्ष लागलेले होतं. ज्या पद्धतीने बंटी शेळके यांनी चक्क भाजप कार्यालयात जाऊन आपला प्रचार केला. तसेच विद्यमान भाजप आमदार विकास कुंभारे यांचा आशीर्वाद घेतला. यासह भाजप विरुद्ध काँग्रेस असा बडकस चौकात प्रियंका गांधी यांच्या रॅलीचा झालेला राडा, त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं.

मतदानाच्या दिवशीही ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहन फोडण्याचाही प्रकार याच ठिकाणी घडला होता. मात्र त्यासोबत निवडून आल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी प्रवीण दटके यांचे हार घालून केलेला स्वागत आणि घेतलेली गळा भेट करणारा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

नागपूर मध्यचा निकाल नेमका काय?

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार प्रवीण दटके यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. प्रवीण दटके यांना 90 हजार 560 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे बंटी शेळके यांना केवळ 78 हजार 928 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजपच्या प्रवीण दटके यांना शेळके यांच्यापेक्षा 11 हजार 632 मते मिळाली आहेत. याचाच अर्थ ही लढत जास्त चुरशीची होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांनादेखील इतर अपक्षांच्या तुलनेत भरपूर मतं मिळवली. ते या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. त्यांना 23 हजार 303 मते मिळाली. त्यामुळे ही लढत तिरंगी ठरली, असं मानायला हरकत नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.