नागपुरातील हिट अँड रन प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर, न्यायालयाने फेटाळली पोलिसांची विनंती

| Updated on: Jul 03, 2024 | 7:40 AM

नागपुरातील राम झुला या उड्डाणपुलावर 25 फेब्रुवारी 2024 रोजी भीषण अपघात घडला होता. एका मर्सिडीज कारने दोन तरुणांना धडक दिली होती. या धडकेत त्या दोन जणांचा मृत्यू झाला.

नागपुरातील हिट अँड रन प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर, न्यायालयाने फेटाळली पोलिसांची विनंती
नागपूर हिट अँड रन प्रकरणी मोठी माहिती समोर
Follow us on

Nagpur Hit And Run Case : नागपुरातील राम झुला हिट अँड रन प्रकरणी तब्बल 4 महिने फरार असलेल्या रितिका उर्फ रितू मालूला सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी रितूला न्यायालयात हजर करत पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने रितूची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत तिची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

चार महिन्यांनी आरोपीचे आत्मसमर्पण

नागपुरातील राम झुला या उड्डाणपुलावर 25 फेब्रुवारी 2024 रोजी भीषण अपघात घडला होता. 25 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्री एका मर्सिडीज कारने दोन तरुणांना धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. मोहम्मद हुसेन व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या अपघातानंतर आरोपी तितका मालू ही फरार होती. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु होता. अखेर चार महिन्यांनी म्हणजेच 1 जुलै 2024 रोजी तिने स्वत:हून आत्मसमर्पण केले.

न्यायलयाने फेटाळली पोलीस कोठडीची विनंती

यानंतर तहसील पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून रितूला अटक केली होती. याप्रकरणी पोलिसांनी रितिका मालूला तहसील पोलिसांनी काल दुपारी न्यायालयात हजर केले. याप्रकरणी पोलिसांनी रितूच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकण्यात आला. त्यानंतर पोलीस कोठडीची विनंती फेटाळून लावत रितूला जामीन मंजूर केला. आता याप्रकरणी तहसील पोलीस हे न्यायालयात अपील करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

नागपुरातील हिट अँड रन प्रकरण नेमकं काय?

नागपुरातील राम झुला उड्डापूलावर 25 फेब्रुवारी 2024 च्या मध्यरात्री एका मर्सिडीज कारने दोन तरुणांना धडक दिली होती. रितिका मालू तिच्या एका मैत्रिणीसोबत सीपी क्लबमध्ये गेली होती. त्यावेळी त्या दोघीही मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास मर्सिडीज कारने घरी परतत होता. कारने घरी परतत असताना रितूने राम झुला उड्डाणपुलावर कारचा वेग वाढवला. यामुळे तिने समोर असलेल्या दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या दोन जणांचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर आरोपी रितिका मालू ही फरार होती. पोलिसांकडून तिचा कसून शोध घेतला जात होता. अखेर 1 जुलै रोजी तिने स्वतःहून आत्मसमर्पण केले. आरोपी महिला चालकाच्या वैद्यकीय चाचण्यांच्या आधारावर पोलिसांनी अपघाताचा सखोल तपास सुरु केला होता. याप्रकरणी पोलिसांनी रितूवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. रितिकावर या घटनेनंतर तहसील पोलिसांनी रितिकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), (निष्काळजीपणाने २७९ वाहन चालविणे), ३३६ (मानवी जीव धोक्यात टाकणारी कृती करणे), ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) व १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.