नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर, कुणाला संधी मिळणार?
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपचा ओबीसी चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे आणि विक्की कुकरेजा यांची नावे आघाडीवर आहेत. तर, काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव आघाडीवर आहे. बावनकुळेंची नाराजी दूर करणार? गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे समर्थक […]
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपचा ओबीसी चेहरा असलेले चंद्रशेखर बावनकुळे आणि विक्की कुकरेजा यांची नावे आघाडीवर आहेत. तर, काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव आघाडीवर आहे.
बावनकुळेंची नाराजी दूर करणार?
गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते. तरीही बावनकुळे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. कामठी-मौदा या त्यांच्या जुन्या मतदारसंघातून भाजपचेच टेकचंद सावरकर हे निवडूण आहे होते. ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुण्याईने अशी चर्चा होती. बावनकुळे हे विदर्भात ओबीसींचा चेहरा आहेत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बावनकुळे यांना उमेदवारी देऊन भाजप ओबीसींची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे.
10 डिसेंबरला होणार मतदान
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 6 सदस्यांची मुदत १ जानेवारी 2022 ला समाप्त होत आहे. यात नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. भाजपच्या गिरीश व्यास यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. या निवडणुकीसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 14 डिसेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीत महानगर पालिका, जिल्हा परिषदेचे सदस्य मतदान करतात.
गेल्या निवडणुकीत झाली होती तडजोड
गेल्या निवडणुकीत गिरीश व्यास यांनी काँग्रेसचे अशोकसिंग चव्हाण यांचे नाव जाहीर केले होते. परंतु, तडजोड झाल्याने गिरीश व्यास अविरोध निवडूण आले होते. गेल्या निवडणुकीत उमदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मुंबईची जागा काँग्रेसने भाई जगताप यांच्यासाठी, तर नागपूरची जागा भाई जगताप यांच्यासाठी सोडण्याची तडजोड करण्यात आली होती. त्यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र मुळक निवडूण आले होते.
भाजपचा अधिक मते असल्याचा दावा
या निवडणुकीत पालकमंत्री नितीन राऊत आणि मंत्री सुनील केदार यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. नागपूर महापालिकेत 151 सदस्य आहेत. यापैकी भाजपच्या नगरसेवकांची संख्या 108 आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या 58 आहे. येथे काँग्रेस आघाडीवर आहे. मतांची एकूण गोळाबेरीज केल्यास भाजपकडे 60 मते अधिक असल्याचा दावा केला जात आहे.
इतर संबंधित बातम्या
नागपूर: एक डिसेंबरपासून कोरोनाच्या पहिल्या डोससाठी मोजावे लागणार पैसे; मोफत लसीकरण बंद