MLC Election : पॉलिटिकल टुरिझमविरोधात काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांची तक्रार; दगाफटक्याच्या भीतीनं भाजप नगरसेवक सहलीवर
मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात येत आहे. नगरसेवकांच्या सहलीवरुन छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
नागपूर: राज्यातील विधानपरिषद निवडणुकांची (Maharashtra Vidhan Parishad Election) रणधुमाळी सुरु आहे. नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. नागपूरच्या जागेवर भाजपनं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना संधी दिली. तर भाजपमधून आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर (Dr Ravindra Bhoyar aka Chhotu Bhoyar) यांना काँग्रेसकडून (Congress) तिकीट देण्यात आले. काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात येत आहे. नगरसेवकांच्या सहलीवरुन छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
छोटू भोयर यांची तक्रारीद्वारे कारवाईची मागणी
भाजपनं मतं फुटू नये म्हणून नगरसेवकांना सहलीवर पाठवलं आहे. छोटू भोयर यांनी सहली विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. विधानपरिषद निवडणुकीचे काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. भाजपने आपले प्रतिनिधी फुटू नये किंवा दगाफटका होऊ नये म्हणून नगरसेवकांना सहलीला पाठवले असून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उमेदवारीमुळं निवडणूक केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फ़णवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
कोण आहेत छोटू भोयर
छोटू भोयर हे 1987 पासून भाजपसाठी काम करत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी भाजपचं काम सुरू केलं होतं. छोटू भोयर हे गेल्या 34 वर्षांपासून भाजपमध्ये होते. छोटू भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. 20 वर्षे ते नगरसेवक राहिलेत. नागपूरचे उपमहापौरपदही त्यांनी भूषवले होते. छोटू भोयर यांनी नागपूर महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदही सांभाळलं आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक सुद्धा आहेत. नागपूर सुधार प्रन्यासचे ते विश्वस्तही होते.
भोयर सामाजिक कामात अग्रेसर
छोटू भोयर यांचा सामाजिक सेवेत नेहमी पुढाकार राहिला. त्यांनी कोरोना काळात चांगलं काम केलं. जनतेची सेवा केली. या त्यांच्या कामाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे कौतुकही केले होते. त्यामुळं कुणावरही नाराजी नसल्याचं त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याचा दिनाक: 23 नोव्हेंबर अर्जांची छाननी: 24 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत: 26 नोव्हेंबर मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4) मतमोजणी : 14 डिसेंबर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक: 16 नोव्हेंबर
इतर बातम्या:
Khamgaon tiger : खामगावमध्ये सीसीटीव्हीत वाघसदृष्य प्राणी कैद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Nagpur पूर्व विदर्भात पारंपरिक धानाची समृद्धता, कृषी विभाग ठरविणार धोरण – सुधांशू पांडे
Nagpur MLC Election Congress Candidate Chhotu Bhoyar file complaint on Election Political Tourism of BJP