Nagpur MLC Voting | पक्षाची तटस्थ भूमिका, तरीही बसपचे दोन नगरसेवक मतदानाला, कोणाला मत देणार?

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बसपने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. खरं तर, बसपची 11 मतं काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेस उमेदवाराचे प्रयत्न सुरु होते. परंतु आता काँग्रेसने आपला उमेदवार बदलला आहे.

Nagpur MLC Voting | पक्षाची तटस्थ भूमिका, तरीही बसपचे दोन नगरसेवक मतदानाला, कोणाला मत देणार?
नागपूर विधानपरिषदेसाठी मतदान
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 9:51 AM

नागपूर : विदर्भातील नागपूर (Nagpur) आणि अकोला-बुलडाणा-वाशिम (Akola Buldana Washim) या दोन विधान परिषदेच्या जागांसाठी (Legislative Council Election) आज मतदान होत आहे. दोन्ही जागा महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. नागपूरच्या निवडणुकीवर बसपाने बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यानंतरही दोन नगरसेवक मतदान करायला आले.

बसप नगरसेवकांचं म्हणणं काय?

“आमच्या पक्षाने काँग्रेस आणि भाजपवर बहिष्कार टाकला आहे, अपक्ष उमेदवारावर नाही. विधान परिषदेत आमचा प्रतिनिधी पाठवण्याची सहा वर्षांतून एकदा संधी मिळते, ते आम्ही केलंय” असं बसप नगरसेवक संजय बोरेवार यांनी सांगितलं.

बसपची भूमिका

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बसपने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. खरं तर, बसपची 11 मतं काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेस उमेदवाराचे प्रयत्न सुरु होते. “काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छोटू भोयर यांना आयात केलं, त्यामुळे आमच्यासाठी काँग्रेस-भाजप सारखी आहे” असं मत बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड संदीप ताजने म्हणाले होते. परंतु आता काँग्रेसने आपला उमेदवार बदलला आहे.

काँग्रेसचा अपक्षाला पाठिंबा

नागपुरात कॉंग्रेसवर आपल्या अधिक अधिकृत उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याची नामुष्की ऐनवेळी ओढवली आहे. आता काँग्रेसचं समर्थन असलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख विरुद्ध भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे अशी लढत होत आहे. नागपुरात भाजपकडे संख्याबळ अधिक असल्यानं भाजपचं पारडं जड आहे.

उमेदवार का बदलला?

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव हायकमांडकडं पाठवण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीतून या निर्णयाला मंजुरी दिली. छोटू भोयर ताकदीने निवडणूक लढत नसल्याचा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आरोप होता. त्यामुळे उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं काँग्रेसच्या गोटात बोललं जातं होतं. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देण्यावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं एकमतही झालं होतं.

काँग्रेसचं पत्रक काय?

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचं समजतं. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनं तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेस सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे.

नागपूर विधानपरिषद

कुठल्या पक्षाकडे किती मतदार?

पक्ष – मतदार

भाजप – 314 काँग्रेस – 144 राष्ट्रवादी – 15 शिवसेना – 25 बसप – 11 विदर्भ माझा – 17 शेकाप – 06 पिरीपी – 06 भरिएम – 03 एमआयएम – 01 अपक्ष – 10 रासप – 03 प्रहार – 01 रिक्त – 02

संबंधित बातम्या :

Nagpur MLC Election | फक्त दोन ओळखपत्राला मान्यता, मतदानाची वेळ 4 पर्यंत, पसंतीक्रमाने मतदान

काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की, छोटू भोयर ऐवजी मंगेश देशमुखांना पाठिंबा जाहीर

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.