Nagpur NMC Election | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा; भाजपा उमेदवार निवडीसाठी करणार सर्व्हे

नागपूर महापालिका निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप नगरसेवकांना मात्र उमेदवारी मिळविण्यासाठी जवळपास पाच सर्व्हेमधून जावं लागणार आहे. कसे करणार आहेत भाजप सर्व्हे बघुया.

Nagpur NMC Election | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा; भाजपा उमेदवार निवडीसाठी करणार सर्व्हे
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 5:47 PM

नागपूर : 15 वर्षांपासून नागपूर महापालिकेत (Nagpur Municipal Corporation) सत्तेत असलेल्या भाजपला येणारी महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळं त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. भाजपमध्ये जुने नगरसेवक असो की मग नवीन. सगळ्यांना कठीण परिस्थितीतून जावं लागणार आहे. कारण भाजप उमेदवारांना तिकीट देण्याआधी प्रत्येक भागात नगरसेवकांनी केलेल्या कामाचा आढावा (Review of work done by corporators) घेतला जाणार आहे. त्यांची नागरिकांत असणारी पत, लोकप्रियता लक्षात घेतले जाणार आहे. नागरिकांशी असलेले संबंध त्याचप्रमाणे त्या उमेदवारांची क्षमता तपासण्यात येणार आहे. अंतर्गत सर्व्हे सुरू झाले आहेत. काही पक्षांतर्गत सर्व्हे (Intra-party survey) होत आहेत. तर काही सर्व्हे मोठ्या एजंसीमार्फत केले जात आहेत. वरिष्ठ नेत्यांचासुद्धा सर्व्ह होणार आहे. त्यामुळे ज्यांचा फरफार्मन्स चांगला त्यालाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. यात अनेकांना धक्का बसण्याची शक्यतासुद्धा वर्तविली जात आहे.

गडकरी, फडणवीसांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न

भाजप नेहमीच कुठल्याही निवडणुकीपूर्वी अभ्यास करत असते. यावेळी सुद्धा तीच पद्धत वापरण्यात येत आहे. प्रत्येक गोष्टीवर आणि कामावर लक्ष ठेवून आहे. नागपूर महापालिकेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळं याकडे अनेक वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा लक्ष ठेऊन आहेत. यातील दोन सर्व्हे आधीच पार पडले आहेत. तर बाकी अंतर्गत पद्धतीने आणि एजंसीच्या माध्यमातून सर्वे सुरू असल्याचे सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी सांगितलं.

नगरसेवकांची धकधक वाढली

नागपूर महापालिकेची प्रभाग रचना सोमवारी सायंकाळपर्यंत निश्चित होईल. मात्र, यासंदर्भात कुणीही अधिकृत माहिती देण्यास तयार नाही. लोकसंख्या वाढल्यामुळं नगरसेवकांची संख्या 151 ऐवजी 156 होणार आहे. महापालिका निवडणूक मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलमध्ये होऊ शकते. अशावेळी भाजपतर्फे सर्व्हे केला जात असल्यानं आपला पत्ता कट तर होणार नाही ना, अशी भीती काही नगरसेवकांना वाटत आहे. काही नगरसेवक आता सेटिंग लावता येते का, याचा प्रयत्न करत आहेत. पण, वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व्हे होत असल्यानं कुणा एका सर्व्हेवर निर्णय घेतला जाणार नाही. त्यामुळं नगरसेवकांची धकधक वाढली आहे. तरीही पक्षाची तिकीट मिळाली नाही, तर दुसऱ्या पक्षातून उभे राहण्याची तयारी काहींनी चालविली आहे.

Photo | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले आमदार विजय रहांगडाले यांचे सांत्वन; आविष्कार रहांगडाले यांचा अपघाती झाला होता मृत्यू

Photo | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले आमदार विजय रहांगडाले यांचे सांत्वन; आविष्कार रहांगडाले यांचा अपघाती झाला होता मृत्यू

नागपुरात कचरा संकलनात अनियमितता; ए. जी. एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांवर काय कारवाई करणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.