NMC Election | नागपूर महापालिका निवडणूक, प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द, अंतिम मतदार यादी 9 जुलैला

मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदारांचा चुकून प्रभाग बदलने, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसने, या संदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतील. या संबंधाने हरकती व सूचना असल्यास 23 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत संबंधित प्रभागाचे क्षेत्रिय झोन कार्यालयात व निवडणूक कक्ष मुख्यालय कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना लेखी स्वरुपात दाखल करता येईल.

NMC Election | नागपूर महापालिका निवडणूक, प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द, अंतिम मतदार यादी 9 जुलैला
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 9:34 AM

नागपूर : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – 2022 करीता राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचनेस 12 मे 2022 अन्वये मंजुरी प्रदान केली आहे. महापालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या (Population) 24 लाख 47 हजार 494 (सन 2011 चे जनगणनेनुसार) आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 4 लाख 80 हजार 759 आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1 लाख 88 हजार 444 आहे. प्रभागाची एकूण संख्या (त्रिसदस्यीय प्रभाग) 52 आहे. तर निवडून द्यावयाच्या महानगरपालिका संदस्यांची संख्या 156 आहे. राज्य निवडणूक आयोगाचे (Election Commission) 23 मे 2022 च्या आदेशानुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या करिता आरक्षण सोडतीचा 31 मे 2022 रोजी कार्यक्रम राबविण्यात आला. आरक्षित जागांची अंतिम अधिसूचना (Notification ) 13 जून रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. दाखल सूचना हरकतीवर निर्णय घेवून प्रभाग निहाय अंतीम मतदार यादी 9 जुलै 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी पत्रकार परिषदेत दिले.

मतदार यादीवर हरकती, सूचना मागविल्या

या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने 2 जून व 16 जून अन्वये मतदार यादीचा कार्यक्रम राबविला. भारत निवडणूक आयोगाकडून 31 मेपर्यंत अद्यावत केलेली विधानसभेची मतदार यादी वापरुन प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली. मतदार यादीचा पुढील प्रमाणे कार्यक्रम जाहीर केलेला आहे. प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे – 23 जून. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी 23 जून ते 1 जुलै. अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसिध्द करणे 9 जुलै. उपरोक्त कार्यक्रमानुसार 31 मे 2022 पर्यंत विधानसभेच्या मतदार यादी मध्ये समाविष्ट झालेल्या/वगळलेल्या/दुरुस्त्या इत्यादी विचारात घेतल्या जातील. प्रभाग निहाय मतदार याद्यांचे विभाजन करण्यात येईल.

नवीन नावांचा समावेश करता येणार

प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी 23 जून रोजी नागपूर महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रिय झोन कार्यालयात तसेच मुख्य कार्यालयात व nmcnagpurelection.org/nmcnagpur.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. 23 जून रोजी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या प्रारुप मतदार यादीत भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभेच्या अद्यावत मतदार यादी व्यतिरिक्त नवीन नावाचा समावेश करण्यात येईल. नावे वगळणे इत्यादी स्वरुपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकाडून केली जात नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदारांचा चुकून प्रभाग बदलने, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसने, या संदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतील. या संबंधाने हरकती व सूचना असल्यास 23 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत संबंधित प्रभागाचे क्षेत्रिय झोन कार्यालयात व निवडणूक कक्ष मुख्यालय कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना लेखी स्वरुपात दाखल करता येईल. पत्रकार परिषदेत अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, सहा. आयुक्त महेश धामेचा उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.