AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन गडकरींचा थेट फार्मा कंपनीच्या मालकाला फोन, नागपुरात एका झटक्यात 10 हजार इंजेक्शन

नागपुरात तर ही परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आहे. (nitin gadkari remdesivir injection corona patient)

नितीन गडकरींचा थेट फार्मा कंपनीच्या मालकाला फोन, नागपुरात एका झटक्यात 10 हजार इंजेक्शन
ANITIN GADKARI AND CORONA PHOTO
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 4:48 PM

नागपूर : राज्यात कोरोना महामारीमुळे सगळेच हैराण आहेत. कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे राज्यातील ठिकठिकाणी आरोग्ययंत्रणेवर ताण पडतो आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स, नर्सेस, तसेच औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागपुरात तर ही परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आहे. त्यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा पुन्हा उपलब्ध करुन देण्यासाठी थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा केली आहे. (Nagpur Nitin Gadkari demands Remdesivir injection to Sun Farma company owner to treat Corona patient)

लवकरच 10 हजार रेमेडिसिव्हीरची इंजेक्शन्स उपलब्ध होणार

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथे सध्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो आहे. तसेच औषधांचाही तुटवडा निर्माण होतो आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी हालचाली केल्या आहेत.

त्यांनी थेट सन फार्मा कंपनीच्या मालकाशी चर्चा केली आहे. तसेच त्यांना रेमेडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावते अशी मागणीसुद्धा सन फार्माच्या मालकाकडे केली. या चर्चेनंतर नागपुरात लवकरच एकूण 10 हजार रेमेडिसिव्हीरची इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहे. आजच्या आज (10 एप्रिल) तत्काळ 5 हजार इंजेक्शन सन फार्माकडून दिले जाणार आहेत. तर उर्वरित 5 हजार इंजेक्शन्स आगामी दोन दिवसांत उपलब्ध करुन दिले जातील.

नागपूरमध्ये कोरोना चाचणी कशी होते? (How to do corona test in Nagpur)

एखाद्याला लक्षणे असली किंवा तो कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असेल आणि त्याला टेस्ट करायची असेल तर नागपुरात विविध ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते.

नागपुरात टेस्ट करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी केंद्र उघडली आहेत. त्या ठिकाणी RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जाते. जवळपास 200 केंद्रांवर ही टेस्ट होते. सोबतच खाजगी रुग्णालय ज्यांना कोव्हिड रुग्णालय जाहीर केलं आहे, तिथे काही खाजगी लॅबमध्ये सुद्धा टेस्ट केली जाते.

इतर बातम्या :

Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : धक्कादायक ! नागपूरात व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नाहीत

LIVE | वाशिममधील रिसोड शहरासह तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाला सुरुवात

PHOTO : साताऱ्याच्या खासदारांकडून विकेंड लॉकडाऊन सत्कारणी, हाती विळा घेऊन गहू काढणीसाठी थेट बांधावर!

(Nagpur Nitin Gadkari demands Remdesivir injection to Sun Farma company owner to treat Corona patient)

नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.