नागपूरच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, शैक्षणिक शुल्कमाफीसह केल्या महत्त्वाच्या मागण्या

कोरोनाकाळात उत्स्फूर्तपणे रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आज संपावर आहेत. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी डॉक्टारांनी हे बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे. नागपूरमधील डॉक्टरदेखील या संपात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.

नागपूरच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, शैक्षणिक शुल्कमाफीसह केल्या महत्त्वाच्या मागण्या
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 4:01 PM

नागपूर : कोरोनाकाळात उत्स्फूर्तपणे रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आज संपावर आहेत. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी डॉक्टारांनी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे. नागपूरमधील डॉक्टरदेखील कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून या संपात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन कायम असणार आहे, अशी भूमिका नागपूरमधील डॉक्टरांनी घेतली आहे.

मागण्या मान्य करा, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरुच

कोरोना काळातील निवासी डॉक्टरांची रूग्णसेवा व झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक शूल्क माफीचे आश्वासन दिले होते. मात्र, फी माफीची आश्वासन पूर्ती न झाल्यामुळे निवासी डॉक्टरांनी आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्डने घेतली आहे.

‘गरज सरो अन वैद्य मरो’ हे सरकारचं धोरण

या आंदोलनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व एमडी, एमएस, डिप्लोमा, सीपीएस, डीएम, एमसीएच डॉक्टर्सनी आपला सहभाग नोंदवला आहे. कोरोना संपताच ‘गरज सरो अन वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे सरकार डॉक्टरांना विसरले असल्याची टीका मार्डचे मेडिकल अध्यक्ष डॉ. सजल बन्सल यावेळी केली.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय?

♦ कोव्हिड भत्ता मिळाला पाहिजे

♦ शैक्षणिक शुल्क माफ झाले पाहिजे

♦राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलच्या समस्या दूर व्हाव्या

♦ पालिका महाविद्यालयातील डॉक्टरांचा टीडीएस, प्रोत्साहन भत्ता, वैद्यकीय पदवुत्तर अभ्यासक्रमाची फी माफ करावी 

अमित देशमुख मार्डच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार

दरम्यान, मार्डच्या प्रतिनिधीसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख चर्चा करणार असल्याची माहिती आहे. आज सकाळपासून सुरू झालेल्या निवासी डॉक्टरांच्या संपाला मिळणारा पाठिंबा पाहता राज्य सरकार निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. निवासी डॉक्टर संपावर गेल्याने पडत असलेल्या रुग्णसेवेवरील ताण पाहता संप मागे घ्यावा अशी वैद्यकिय शिक्षण विभागाकडून विनंतीही करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप कायम राहील अशी भूमिका मार्ड डॉक्टरांनी घेतली आहे.

इतर बातम्या :

दुसरा डोस घेतल्यानंतर लोक नियम पाळत नसल्यानं कोरोनाबाधित, अजित पवारांच्या नागरिकांना कानपिचक्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं नवं मिशन, आता देशातील शहरं कचरामुक्त करण्याचा संकल्प

शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अजितदादांची ग्वाही

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.